गणूर चौफुलीवरील चांदवड – मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करतांना माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, प्रकाश शेळके, विजय जाधव, संजय जाधव, समाधान जामदार, नवनाथ आहेर, अल्ताफ तांबोळी, सुदर्शन पानसरे, हनुमंत गुंजाळ, दत्तात्रय गांगुर्डे, किसन डावखर आदीसह आंदोलनकर्ते.

चांदवड : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मंगळवार (दि.८) रोजी पुकारण्यात आलेल्या बंद मध्ये सहभागी होत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाकप, किसान सभा, प्रहार संघटनेच्या वतीने येथील गणूर चौफुलीवरील चांदवड – मनमाड राज्यमार्गावर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाचा शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात येऊन नायब तहसीलदार अमित पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ ला चांदवड शहरातील व्यापाऱ्यांनी १०० टक्के प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. या बंद दरम्यान शहरातील अत्यावश्यक सुविधा व दैनंदिन भाजीपाला खरेदी – विक्री नियमीत सुरु होते. यामुळे नागरिकांची गैरसोय टळली. मंगळवार (दि.८) रोजी ११ वाजता सर्वपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गणूर चौफुलीवरील चांदवड –मनमाड राज्यमार्गावर उतरत रस्ता बंद केला. यावेळी आंदोलनकर्त्यानी एक तास ठिय्या दिला. कांदा पिकावरील निर्यातबंदी तत्काळ हटवा, शेतकऱ्यांच्या हक्कावर निर्बंध आणणाऱ्या शेतकरी कृषी सुधारणा कायदा रद्द करा या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार अमित पवार यांना देण्यात आले.

या आंदोलनात कॉंग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, तालुकाध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादीचे नेते विजय जाधव, शहराध्यक्ष प्रकाश शेळके, समाधान जामदार, अल्ताफ तांबोळी, नवनाथ आहेर, अन्वर पठाण, सुदर्शन पानसरे, हनुमंत गुंजाळ, किसन डावखर, दत्तात्रय गांगुर्डे, शिवाजी कासव, नंदू कोतवाल, भाऊसाहेब शेलार, नवनीत सोनवणे, भास्करराव शिंदे, महेंद्र शिंदे, गोकुळ देवरे, रिजवान घासी, जाहिद घासी, अनिल कोतवाल, राहुल कोतवाल, राम बोरसे, गोरख ढगे, कैलास सोनवणे, राहुल एलींजे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.