Kanda-Utpadak-Shetkari-aandolan

शेतकऱ्यांकडील कृषि मालाची खरेदी केंद्रावर थेट खरेदी करणे आपेक्षित असताना जाहिर लिलावाव्दारे कृषि मालाची खरेदी केली. याप्रकरणी सदर थेट पणन परवाना धारकाचे नावामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याने तसेच खाजगी बाजार चालू केल्याचा संभ्रम निर्माण होत असल्याने सदर परवाना धारकाच्या नावावर सचिव, देवळा कृषि उत्पन्न बाजार समिती, देवळा, ता. देवळा, जि. नाशिक यांनी आक्षेप घेतला होता.

    देवळा : सुनिल आहेर कृषि मार्केट यार्ड प्रा.लि. देवळा, या थेट पणन परवाना धारकाने खाजगी बाजार स्थापन केला असल्याचे भासवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेश पणन संचालक सतीश सोनी यांनी दिले आहेत. याबाबत देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव माणिक निकम यांनी तक्रार दाखल केली होती.

    शेतकऱ्यांकडील कृषि मालाची खरेदी केंद्रावर थेट खरेदी करणे आपेक्षित असताना जाहिर लिलावाव्दारे कृषि मालाची खरेदी केली. याप्रकरणी सदर थेट पणन परवाना धारकाचे नावामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याने तसेच खाजगी बाजार चालू केल्याचा संभ्रम निर्माण होत असल्याने सदर परवाना धारकाच्या नावावर सचिव, देवळा कृषि उत्पन्न बाजार समिती, देवळा, ता. देवळा, जि. नाशिक यांनी आक्षेप घेतला होता. प्रतिवादी यांचे वतीने सुनिल आहेर यांनी सदर आक्षेप मान्य करुन त्यांच्या थेट पणन परवान्यातील नावामध्ये बदल करणेबाबतचा अर्ज सादर करणार असल्याचे सुनावणी दरम्यान सांगितले. याप्रमाणे अर्जदार यांच्या नावाबाबतच्या आक्षेपास अनुसरुन प्रतिवादी हे नविन नावाने थेट पणन परवान्यासाठी अर्ज सादर करण्यास पात्र राहतील. सबब, प्रतिवादी यांना प्रदान केलेला थेट पणन परवाना रद्द करणे क्रमप्राप्त असल्याचे पणन संचालक सोनी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.