संशयीत आरोपी नगरसेवक मुश्तरकीम डिग्निटी पत्रकार परिषद घेत पोलीसांना शरण

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात मालेगाव आणि अमरावतीमध्ये नोव्हेंबर महिन्यात दंगली उसळल्या. त्यात मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे आले. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या असून, इतर 42 जणांवर कारवाई केली आहे. तर, दंगलीच्या सूत्रधाराचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

    मुंबई : मालेगाव दंगल प्रकरणातील संशयित आरोपी जनता दलाचे सरचिटणीस व नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी अखेर पोलिसांना शरण आला आहे. त्यापूर्वी त्याने एक पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. पक्षाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शहराला टार्गेट केले, असा आरोप त्याने केला. विशेष म्हणजे अजूनही या दंगलीतील 16 जण फरार आहेत. संशयित आरोपी शरण घेण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत आहे, याचा साधा सुगावाही गाफिल पोलीस यंत्रणेला नव्हता. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    या पत्रकार परिषदेत राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी शासन केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत विरोधकांचा आवाज दडपण्याचा, मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मालेगाव येथील मोर्चा व दंगल प्रकरणी जनता दल व एमआयएम कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे त्याचाच परिपाक असून, राज्य शासनाने हे षडयंत्र रचल्याचा आरोप डिग्निटी यांनी केला आहे.

    त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात मालेगाव आणि अमरावतीमध्ये नोव्हेंबर महिन्यात दंगली उसळल्या. त्यात मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे आले. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या असून, इतर 42 जणांवर कारवाई केली आहे. तर, दंगलीच्या सूत्रधाराचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

    आमच्यासह सर्व धार्मिक व राजकीय नेते निवेदन देऊन आपापल्या कामकाजात व्यस्त झाले. घरी परतले. मात्र, मोर्चानंतर बंदला शहरात हिंसक वळण लागले. रॅलीत घुसखोरी केलेल्यांनी हा गोंधळ घातला असावा. मात्र, या प्रकरणी फक्त आमच्यावरच गुन्हे दाखल झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांवर का नाही? असा सवाल देखील डिग्निटी यांनी केला आहे.