खेडगांव शेतकरी आत्महत्येप्रकरणी कर्मचा-यावर कारवाई करा ; भाजपाचे किशाेर कदम यांची मागणी

ओझर गावातील व्यापारी, सामान्य नागरीक, शेतकरी यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. कायद्यानुसार त्यांना पूर्वसूचना न दिल्याने संतापाचे वातावरण आहे. कायदा सुव्यवस्था बिघडल्यास महावितरण जबाबदार राहील, असा इशारा भाजपने दिला. ओझरमधील गरीब ज्येष्ठ महिलेचे वीज कनेक्शन तोडल्याने तीने किशोर कदम यांच्याकडे संपर्क साधला.

    ओझर : खेडगाव येथील बाळासाहेब ठुबे या शेतकऱ्याने वीज कनेक्शन ताेडल्याने आत्महत्या केली. या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या महािवतरणच्या कर्मचारी, अधिकाऱ्यािवरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे निफाड तालुका उपाध्यक्ष किशाेर कदम यांनी केली.वीज बील थकबाकीप्रकरणी ओझऱमधील व्यापारी, नागरिक, शेतकरी यांचे वीज कनेक्शन महावितरणने तोडल्याने त्यांनी महावितरणच्या ओझर कार्यालयात धाव घेतली.

    यावेळी भाजपचे निफाड तालुका उपाध्यक्ष किशोर कदम, ओझर शहर सरचिटणीस जगदीश उगले यांच्या नेतृत्वाखील ग्राहकांनी अभियंता विक्रम सोनवणे यांना बील भरण्यासाठी नोटीस देऊन मुदत देण्याची व आधी नोटीस नंतर कारवाई अशी मागणी केली. विना नोटीस ग्राहकाचे म्हणणे ऐकूण घेऊनच विज बिलाबाबत निर्णय घ्यावा, आधीच शेतकरी एक वर्षापासून लॉकडाऊनमुळे त्रस्त झाला आहे.

    ओझर गावातील व्यापारी, सामान्य नागरीक, शेतकरी यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. कायद्यानुसार त्यांना पूर्वसूचना न दिल्याने संतापाचे वातावरण आहे. कायदा सुव्यवस्था बिघडल्यास महावितरण जबाबदार राहील, असा इशारा भाजपने दिला. ओझरमधील गरीब ज्येष्ठ महिलेचे वीज कनेक्शन तोडल्याने तीने किशोर कदम यांच्याकडे संपर्क साधला.

    सरकार न्याय देत नसल्यामुळे तिचे निवेदन राज्यपालांना ई मेल करण्यात आले आहे. त्यांनी दखल घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. वीज बील भरण्यासाठी पुरेशी मुदत द्या, जास्त रक्कम असेल तर हप्ते करुन द्या, सक्तीची वीज वसुली करु नये,अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबरच नागरिक, व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीज कनेक्शन तोडल्यास महावितरणविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी भाजपतर्फे देण्यात आला.