राष्ट्रवादीचे काम जनतेपर्यंत पोहोचवा ; आमदार माणिकराव काेकाटेंचे आवाहन

खा. शरद पवार राज्यात, देशात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. राज्याचा अभ्यास, हजारो लोकांना ओळखण्याचा, राज्यभर वाहनाद्वारे फिरून, राज्यातील भौगोलिक परिसर स्वतः डोळ्याखालून घालणारे, शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत जाणारे नेतृत्व म्हणून जनतेने त्यांना जाणता राजा ही उपाधी दिली असून ती ते आपल्या कर्तृत्वाने सार्थ ठरवितात, असे कोकाटे म्हणाले.

    सिन्नर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून खा. शरद पवार यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आपण काम करत राहणे महत्वाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात राष्ट्रवादीचे काम सुरू असल्याने आपण सर्व नशीबवान असल्याचे प्रतिपादन आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.

    यांची उपस्थिती
    खा. पवार यांच्या मुंबईत साजर्‍या करण्यात आलेल्या वाढदिवसाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर खा. पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे, शहराध्यक्ष सुभाष कुंभार, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र चव्हाणके, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, बाजार समितीचे माजी उपसभापती सोमनाथ भिसे उपस्थित होते.

    राष्ट्रवादीची सत्ता आणा
    खा. शरद पवार राज्यात, देशात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. राज्याचा अभ्यास, हजारो लोकांना ओळखण्याचा, राज्यभर वाहनाद्वारे फिरून, राज्यातील भौगोलिक परिसर स्वतः डोळ्याखालून घालणारे, शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत जाणारे नेतृत्व म्हणून जनतेने त्यांना जाणता राजा ही उपाधी दिली असून ती ते आपल्या कर्तृत्वाने सार्थ ठरवितात, असे कोकाटे म्हणाले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे जाळे निर्माण करा आणि येणार्‍या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फक्त आणि फक्त राष्ट्रवादीचीच सत्ता आणून त्या माध्यमातून खा. शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे आवाहन कोकाटे यांनी कार्यकर्त्यांना केले.

    यांची उपस्थिती
    भिसे, कुंभार यांनी मनोगतातून खा. पवार यांना शुभेच्छा दिल्या. खा. पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांचा वाढदिवस दुसर्‍या दिवशी येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने दोन केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, महिला तालुकाध्यक्षा मंगला कुर्‍हाडे, शहराध्यक्षा मनीषा माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.