देवळा तालुक्यात १ एप्रिल पासून दहा दिवस जनता कर्फ्यू

दहा दिवस पाळण्यात येणाऱ्या जनता कर्फ्यु मध्ये दवाखाने , मेडिकल, पीठ गिरण्या व दुध डेरी वगळता संपुर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे.  देवळा शहर व तालुक्यात आज पर्यंत अडीच हजाराच्या आसपास कोरोना बाधित रुग्ण आढळून आले

    देवळा. देवळा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता  प्रादुर्भाव लक्षात घेऊन दि. १ एप्रिलपासून दहा दिवस संपूर्ण देवळा तालुक्यात जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय आज मंगळवारी दि. ३० रोजी  देवळा येथे झालेल्या  सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

    दहा दिवस पाळण्यात येणाऱ्या जनता कर्फ्यु मध्ये दवाखाने , मेडिकल, पीठ गिरण्या व दुध डेरी वगळता संपुर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे.  देवळा शहर व तालुक्यात आज पर्यंत अडीच हजाराच्या आसपास कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, आतापर्यंत ३१ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढतच असून ही साखळी तोडण्यासाठी  संपूर्ण तालुक्यात  दहा दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा एकमुखी निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले  आहे.