
रँडम तपासणी मध्ये गेलेल्या जेनॉम् सिक्वेंसिंग मध्ये नाशिक शहरातील पहिला ओमायक्रोन रुग्ण आढळून आलेला आहे( The 1St Patient of Omicron found in Nashik). हा रुग्ण नॉन सिम्प्टमिक असून प्रकृती व्यवस्थित असल्याचेप प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नाशिक : रँडम तपासणी मध्ये गेलेल्या जेनॉम् सिक्वेंसिंग मध्ये नाशिक शहरातील पहिला ओमायक्रोन रुग्ण आढळून आलेला आहे( The 1St Patient of Omicron found in Nashik). हा रुग्ण नॉन सिम्प्टमिक असून प्रकृती व्यवस्थित असल्याचेप प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु या व्हरिएंट च्या प्रसाराची गती विचारात घेता कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरची सर्व तत्व स्वतःहूनच व्यवस्थित पाळणे आवश्यक आहे. स्वतःचे लसीकरण करून घेणे हे यावरील सर्वात महत्वाचे सुरक्षाकवच आहे. त्यामुळे उरलेल्या नागरिकांनी तातडीने स्वतःचे लसीकरण करून घ्यावे असे अवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित नवीन रुग्णांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने तिसरी लाट सुरु झाल्याची भिती निर्माण झाली आहे. राज्यात एका दिवसात साडेपाच हजार रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. आकडेवारी पाहता महाराष्ट्रात भयानक स्थिती असून मुंबई पुणे डेंजर झोनमध्ये आहेत(Excitement over finding five and a half thousand patients in one day; Terrible situation in Maharashtra! Mumbai in Pune Danger Zone?). मुंबईत २४ तासांत ३६७१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर, पुण्यातही कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतोय. पुण्यात कोरोनाचे नवीन २९८ रुग्ण आढळले आहेत.