शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला… अन मग झाले असे की…  नुकसानीची पाहणी दौऱ्यावर आलेल्या बागलाणच्या आमदाराला ठेवले काेंडून!

आम्हाला गेल्या अवकाळी पावसाची तसेच पीक विम्याचे पैसे अद्याप मिळाले नसल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत. वीज कनेक्शन तोडणी बंद करावी. ज्यांचे वीज कनेक्शन तोडले आहेत त्यांचे कनेक्शन पूर्ववत करावे, अशी मागणी शेतकरयांनी केली. कुणाचेही वीज कनेक्श तोडले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार बोरसे यांनी दिली. तसेच, शासनाकडे सर्व मागण्यांसाठी ठोस पाठपुरावा करु. मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे आमदारांनी सांगितल्यानंतर शेतकऱ्यांचा संताप कमी झाला. त्यानंतर आमदारांना ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर काढण्यात आले.

    सटाणा : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना अस्मानी-सुल्तानी संकटाचा सामना करावा लागत आहे. या ना त्या कारणाने शेतकऱ्यांचा माल अतिशय कमी दरात विकला जात असल्याने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे. दाेन दिवसांपूर्वी तालुक्यातील केरसाणे येथे गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी दौरा करणारे आमदार दिलीप बोरसे गेले हाेते. यावेळी शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी आमदार बाेरसे यांनाच ग्रामपंचायत कार्यालयात कोंडल्याची बाब समोर आली आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या आहेत. दरम्यान, मोठ्या प्रयत्नांनंतर आमदारांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

    आमदार बोरसे हे नुकसानीची पाहणी करून केरसाणे ग्रामपंचायत कार्यालय जवळ आले. तेथे शेतकरी वर्गाशी संवाद साधत होते. त्याचवेळी काही शेतकरयांनी संताप व्यक्त करून ग्लामपंचायत कार्यालयामध्ये आमदार दिलीप बोरसे यांना डांबून ठेवले. शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. आम्ही तुम्हाला याच्यासाठी विधानसभेत पाठवले का, तुम्ही काय करतात, असे प्रश्नांना भडिमार आमदारांवर सुरु केला. एकीकडे शासन वीज कनेक्शन तोडत आहेत. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. आपण करतात काय असा सवाल उपस्थित करून संतस शेतकरयांनी आमदारांना डांबून ठेवले.