कांद्याच्या नगरीत अंधश्रद्धेचा कळस! लाल कापड बांधलेले मडके रस्त्याच्या मधोमध ठेवून पळ

अमावस्या, पौर्णिमा किंवा सूर्य-चंद्र ग्राहणाच्या मध्यरात्रीच्या सुमारास भूत, भानामती, बुवाबाजी, जादूटोणा, मंत्रतंत्र, श्रद्धा प्रक्रिया अश्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटना घडत असतात अशी घटना कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कोटमगाव त्रिफुलीवर घडली आहे. 

    लासलगाव : आशिया खंडात कांद्याची प्रसिद्ध असलेली बाजारपेठ लासलगाव येथे एकविसाव्या शतकात आज अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळाला आहे होळी पौर्णिमा एकत्र असल्याने लासलगाव शहरातील मेनरोड वरील कोटमगाव त्रिफुली वर लाल कापडाने बांधलेले मडके ठेवण्यात आल्याने वाहन धारकांमध्ये खळबळ उडाली आहे हा संपूर्ण प्रकार तेथे जवळ असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला

    अमावस्या, पौर्णिमा किंवा सूर्य-चंद्र ग्राहणाच्या मध्यरात्रीच्या सुमारास भूत, भानामती, बुवाबाजी, जादूटोणा, मंत्रतंत्र, श्रद्धा प्रक्रिया अश्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटना घडत असतात अशी घटना कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कोटमगाव त्रिफुलीवर घडली आहे.  रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोटरसायकल वरून अज्ञात दोघे जण आले पाठीमागे बसलेला लुंगी घातलेला इसम लाल कापड बांधलेले मडके घेऊन खाली उतरतो यावेळी मोठ्या संख्येने या रस्त्यावर कुत्रे होते या कुत्र्यांना पळवून लावत हा अज्ञात इसम मडके ठेवून दुसऱ्या सहकारीच्या मदतीने मोटरसायकल वर बसत पळ काढतो मात्र सकाळी अनेक वाहने या मडक्याला चुकवत रस्ता काढतात आणि या मडक्याकडे आश्चर्याने आपल्या नजरा लावून पहात मार्गस्थ होतात मात्र कोणीही हे लाल कापडाने बांधलेल असलेले मडके अंधश्रद्धेपोटी रस्त्याच्या बाजूला करत नाही अशा वेळी पोलिसांना माहिती मिळते आणि लासलगाव पोलिस स्टेशनचे दोन कर्मचारी त्या ठिकाणी दाखल होत मडके उचलून घेऊन जाण्याच्या तयारीत असताना अनिसा चे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचत पोलिसांकडून त्या मडक्यात काय आहे यात पाहणी करतात तर त्यामध्ये काही मिरच्या आणि मीठ असल्याचे समोर आले असून हा संपूर्ण प्रकार अंधश्रद्धा पसरवणारा असून याची पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई करणे गरजेचे असल्याचे अनिसा कार्यकर्ते राजेंद्र कराड यांनी मागणी केली यावेळी शिवसेनेचे प्रकाश पाटील ,दिपक परदेशी होते

    अज्ञात दोन व्यक्तींनी कोटमगाव रोड च्या दिशेने येत लासलगाव येथील कोटमगाव त्रिफुली एक लाल कापड बांधलेले मडके रस्त्याच्या मधोमध ठेवून पळ काढला हा संपूर्ण प्रकार तेथे असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे या प्रकाराची गंभीर दखल घेत लासलगाव पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने या अज्ञात व्यक्तींचा शोध सुरु केला असून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे
    -राहुल वाघ , सहाय्यक पोलीस निरीक्षक ,लासलगाव पोलीस ठाणे