
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवले, हे दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये एवढ्या चौकशा सुरू आहेत की भ्रष्टाचाराला मर्यादाच राहिली नाही. कायदा सुव्यवस्था कुठेच दिसत नाही. यावरून राज्यात काय चाललेय याची कल्पना करू शकता. हे तीन पक्षाचे सरकार आहे. मात्र कोनामध्येही एकमत नाही. अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत, तरीही कारवाई केली जात नाही. हा या सरकामध्ये निर्लज्जपणाचा कळस आहे. बदल्यांमध्ये पैसे घ्यायचे याच्या व्यतिरिक्त सरकारला काम नाही, अशी टीका महाजन यांनी केली(Girish Mahajan's attack on the government).
अहमदनगर : भाजपा नेते गिरीश महाजन यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवले, हे दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये एवढ्या चौकशा सुरू आहेत की भ्रष्टाचाराला मर्यादाच राहिली नाही. कायदा सुव्यवस्था कुठेच दिसत नाही. यावरून राज्यात काय चाललेय याची कल्पना करू शकता. हे तीन पक्षाचे सरकार आहे. मात्र कोनामध्येही एकमत नाही. अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत, तरीही कारवाई केली जात नाही. हा या सरकामध्ये निर्लज्जपणाचा कळस आहे. बदल्यांमध्ये पैसे घ्यायचे याच्या व्यतिरिक्त सरकारला काम नाही, अशी टीका महाजन यांनी केली(Girish Mahajan’s attack on the government).
महाजन यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून सरकारला धारेवर धरले. आमच्या सरकारच्या काळात मोर्च्यांनी रेकॉर्ड मोडले. मात्र आम्ही प्रत्येक मोर्चाला स्वतःहून सामोरे जायचो. या सर्वाचा मी साक्षीदार आहे. मात्र या सरकारमध्ये कोणी कोणाची दखल घेत नाही.
तुम्ही मोर्चा काढा उपोषणाला बसा किंवा मरा; या सरकारला कुठलेही सोयरसुतक नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला मंत्री जाऊन भेटले असते तर हा प्रश्न तेव्हाच मिटला असता, असे महाजन म्हणाले.