गर्दुल्ल्यांचा कहर ! मनपा शाळेच्या सुरक्षारक्षकाला दारूड्यांकडून जबर मारहाण

सुदैवाने सुरक्षारक्षकाचा एक डोळा बाल बाल बचावला.वेळीच नागरिकांनी धावपळ करत सुरक्षा रक्षकांचे प्राण वाचविले. यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. सदर मद्यपी विरोधात कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी जोर धरली आहे.

    सिडको : शाळेच्या आवारात मद्यप्राशन करू नका असे सांगितल्याचा राग आल्याने मद्यपी टवाळखोरांनी महापालिका शाळेच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. गणेश चौकामध्ये नाशिक महापालिकेचे माध्यमिक विद्यालय आहे.

    सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने येथे परिसरातील काही मद्यपी व गर्दुल्ले नशा करण्यासाठी नेहमी येत असतात. सदर प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिक येथील सुरक्षारक्षकाकडे नेहमी तक्रार करत असे. नागरिकांची तक्रारिची दाखल घेत येथील सुरक्षारक्षक संतोष भिकाजी निकम यांनी बुधवारी संबंधित मद्यपी व गर्दुल्लेना हा महापालिका शाळेचा परिसर आहे. कृपया इथं येऊन मद्यपान करू नका असे सांगितले. याचा राग आल्याने संबंधितांनी सुरक्षारक्षकास दगड काठ्यानी बेदम मारहाण केली. सुदैवाने सुरक्षारक्षकाचा एक डोळा बाल बाल बचावला.वेळीच नागरिकांनी धावपळ करत सुरक्षा रक्षकांचे प्राण वाचविले. यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. सदर मद्यपी विरोधात कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी जोर धरली आहे.