पंतप्रधान हा एका पक्षाचा नसतो, त्यांचा आदर करावा! ; पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुंडे यांनी नाव न घेता पटोले याच्यावर टीका केली. पंतप्रधान हा एका पक्षाचा नसतो.हे देशाच्या संविधानातील महत्वाचे पद असून ते संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्याबद्दल कोणीही बोलताना पातळी सोडून बोलू नये, अशी टीका त्यांनी केली.

  येवला : पंतप्रधान हा एका पक्षाचा नसतो.हे देशातील महत्वाचे पद असून पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात.त्यांच्या बद्दल कोणीही बोलताना पातळी सोडून बोलणे चुकीचे आहे असे मत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तथा माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

  काैटुंबीक संबंध
  येवला शहरात दौऱ्यावर आलेल्या मुंडे यांनी विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे व शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार दराडे व माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांचे कौटुंबिक संबंध असल्याने पंकजा मुंडे यांनी दराडे बंधूच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

  यांनी केला सत्कार
  यावेळी सामजिक विषयांवर चर्चा झाली. दराडे कुटुंबाच्या वतीने येवल्याची पैठणी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार दराडे बंधूसह जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, मीना दराडे, डॉ. कविता दराडे, सिद्धांत दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी भाजपाचे नगरसेवक प्रमोद सस्कर, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष सुनील काटवे यांनीही त्यांचा सत्कार केला.

  पातळी साेडून बाेलू नका
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुंडे यांनी नाव न घेता पटोले याच्यावर टीका केली. पंतप्रधान हा एका पक्षाचा नसतो.हे देशाच्या संविधानातील महत्वाचे पद असून ते संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्याबद्दल कोणीही बोलताना पातळी सोडून बोलू नये, अशी टीका त्यांनी केली.

  भाजपामध्ये नाराज?
  ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात बोलताना ८ फेब्रुवारीला कोर्टात निर्णय लागेपर्यंत त्याची मी प्रतीक्षा करणार आहे. मात्र पुढील होणाऱ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणशिवाय होत असून याची मनाला पीडा आहे. याप्रश्नी सरकार आपलं मत कसे मांडते याच्यावर आम्ही लक्ष ठेवून असून सरकारने प्रभावीपणे भूमिका मांडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भाजपमध्ये आपण नाराज आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला नंतर स्मितहास्य करून मुंडे यांनी त्यावर उत्तर देणे टाळले.