युवतीला ब्लॅकमेलिंग करत बदनामी करण्याची धमकी ; देवळा पोलिसात गुन्हा दाखल

गेल्या वर्षभरापासून युवकाने पीडित चोवीस वर्षीय युवतीच्या नावाचे फेसबुक अकाउंट सर्च करून दोन बनावट अकांउट आलेल्या पैकी एका अकांउटला युवतीसोबतचा फोटो ठेवून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअँप या सोशलमिडीयाच्या माध्यमाव्दारे तू जर माझ्याशी शरीर संबंध ठेवले नाही. माझ्याशी लग्न करायला नकार दिला.

    देवळा :  सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन समाजात बदनामी करेल, अशी धमकी देत चोवीस वर्षीय युवतीला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार घडला आहे. देवळा पोलीस ठाण्यात संबंधित युवकाविरोधात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ बाळू सोनवणे, रा. साकुरी, ता. जुन्नर असे संशयित आरोपीचे नाव आहे.

    बनावट अकाऊंटचा वापर
    देवळा पोलिसांत पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या वर्षभरापासून युवकाने पीडित चोवीस वर्षीय युवतीच्या नावाचे फेसबुक अकाउंट सर्च करून दोन बनावट अकांउट आलेल्या पैकी एका अकांउटला युवतीसोबतचा फोटो ठेवून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअँप या सोशलमिडीयाच्या माध्यमाव्दारे तू जर माझ्याशी शरीर संबंध ठेवले नाही. माझ्याशी लग्न करायला नकार दिला. मला व्हाट्सअॅपला ब्लॉक केले किंवा माझ्याशी बोलणे बंद केले; तर मी तुझ्या नावाचे आणखी बनावट अकाउंट उघडून आपले फोटो व्हायरल करेल आणि तुझी नातेवाईकांमध्ये बदनामी करेल, तुझे लग्न हाेऊ देणार नाही, अशी धमकी देत युवतीला ब्लॅकमेलिंग करत आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात सिद्धार्थ बाळू सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला अाहे. पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास भोज करत आहेत.