२२ पासून तीन दिवसीय ऑनलाइन अहिराणी संमेलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी देखील तीन दिवस पहिले विश्व अहिराणी साहित्य संमेलन भरले होते. यात जगातील पाच खंड व २७ देशातील अहिराणी भाषिकांनी सहभाग नोंदवला होता. यंदा ही ओमायक्राॅनच्या भीतीमुळे दुसरे संमेलन ऑनलाइन घेण्याचे निश्चित झाले आहे.

    मालेगाव : जागतिक अहिराणी परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास महामंडळाचे दुसरे जागतिक ऑनलाइन अहिराणी साहित्य २२ ते २४ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेचे सहकार्याध्यक्ष डॉ. एस. के. पाटील यांनी दिली.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी देखील तीन दिवस पहिले विश्व अहिराणी साहित्य संमेलन भरले होते. यात जगातील पाच खंड व २७ देशातील अहिराणी भाषिकांनी सहभाग नोंदवला होता. यंदा ही ओमायक्राॅनच्या भीतीमुळे दुसरे संमेलन ऑनलाइन घेण्याचे निश्चित झाले आहे. या संदर्भात अध्यक्ष विकास पाटील, बापूसाहेब हटकर व कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. पुढील रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल, अहिराणी भाषिक रसिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.