देवळालीत १५ दिवसांत तीन तोतया लष्करी अधिकाऱ्यांना अटक

लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रात संशयित रित्या हे तोतया लष्करी अधिकारी फिरत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल दोन जण या परिसरात फिरत असताना संशय येताच लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना ताब्यात घेतलं. तर १५ दिवसांपूर्वी त्यांच्यासारख्याच एकाला याच परिसरातून ताब्यात घेण्यात आलं होतं.त्यामुळे प्रतिबंधीत आणि संवेदनशील भागात दोन वेळा अशा घटना घडल्याने खळबळ उडाली.

    नाशिक: देवळाली कॅम्प भाग हा लष्कर परिसर म्हणून ओळखला जातो. देवळाली परिसरात असलेला हा संपूर्ण लष्कराचा भाग एक प्रतिबंधित आणि संवेदनशील भाग आहे. या ठिकाणी भारतीय सैन्याकडे असलेल्या विविध आधुनिक आणि युद्धासाठी वापरण्यात येत असलेल्या तोफांसह इतर शस्त्रास्त्रांच प्रशिक्षण दिलं जातं. मात्र अशा संवेदनशील परिसरात गेल्या १५ दिवसात तीन तोतया लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

    लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रात संशयित रित्या हे तोतया लष्करी अधिकारी फिरत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल दोन जण या परिसरात फिरत असताना संशय येताच लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना ताब्यात घेतलं. तर १५ दिवसांपूर्वी त्यांच्यासारख्याच एकाला याच परिसरातून ताब्यात घेण्यात आलं होतं.त्यामुळे प्रतिबंधीत आणि संवेदनशील भागात दोन वेळा अशा घटना घडल्याने खळबळ उडाली. ताब्यात घेतलेल्या या संशयिताकडे चौकशी केली असता हे संशयित उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देवळाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेची अधिक चौकशी पोलीस आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.