पाटोद्यात प्रहारच्यावतीने तिरडी आंदोलन ; भारत बंदला पाठींबा

-तिरडी आंदोलनाची तालुक्यात चर्चा

येवला : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून बहुसंख्य राजकीय पक्षांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या वतीने तालुक्यातील पाटोदा येथे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकार विरोधात तिरडी आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात केंद्र शासनाची प्रतिकात्मक तिरडी काढली जाणार असून शेतकरीही या अनोख्या तिरडी आंदोलनाला उपस्थित रहाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ७/१२वर तुमच नाव शाबूत ठेवायच असेल तर ८/१२ च्या भारत बंद मध्ये सामील व्हा असे आवाहनही प्रहारच्या वतीने सोशल मीडियावर केले जात आहे.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकास विरोध म्हणून गेले दहा दिवस पंजाब,हरियाणातील शेतकरी दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असतांना त्यांना रस्त्यावर अडथळे टाकून आडवून आंदोलक शेतकऱ्यांवर कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे मारणे,अश्रूधुराच्या नळकांड्या फोडणे,शांतपणे आंदोलन चालू असतानाही अमानुष लाठीचार्ज करून आंदोलक शेतकरी जणू शत्रू देशातून आल्यासारखी क्रूर वागणूक देत आहेयाचा निषेध म्हणून देशभरातील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने भारत बंदचे आवाहन केले असून येवला तालुका प्रहार च्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ भारत बंद ला पाठींबा देऊन या अन्यायकरी सरकार विरोधात तिरडी आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हजर रहावे असे आवाहन तालुका प्रहार तर्फे करण्यात आले आहे