नाशिकच्या घोटी टोलनाक्यावर वाहतूक कोंडी ; छगन भुजबळ यांनी स्वतः विना टोल गाड्या सोडून दिल्या

नाशिक : वीकएण्ड आणि सलग तीन दिवस असलेल्या सुट् यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे घोटी टोलनाक्यावर आज जवळपास दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

यावेळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असतांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपला ताफा बाजूला थांबवून घोटी टोल नाक्यावर स्वतः उभे राहून सर्व वाहने सोडण्याच्या सूचना केल्या. यानंतर येथील वाहतूक सुरळीत होईपर्यंत मंत्री छगन भुजबळ हे घोटी टोल नाका येथे थांबून त्यांनी प्रवाशांना दिलासा दिला. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.