विजेच्या संकटातवर मात करण्याचा प्रयत्न ; सौरऊर्जेवर पिकवली जातेय ३५ एकर द्राक्षबाग

सौरपंप बसवतांना जास्तीत जास्त दाब कसा निर्माण होईल याची काळजी घेतली त्यात चांगले यश प्राप्त झाले त्यामुळे एकावेळी जास्त द्राक्ष बागांना पाणी देणे शक्य होते, असे क्रॅनोवेटिव्ह पावरटेकचे संचालक निखिल टर्ले यांनी सांगितले.

  पिंपळगाव बसवंत : उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच नव्या तंत्राचा वापर करून पिंपळगाव बसवंत येथील प्रगतशील द्राक्ष उत्पादक प्रभाकर मोरे यांनी सौरऊर्जेवर चालणारा पंप बसवून तब्बल ३५ एकर द्राक्ष बाग फुलवली असून विजेच्या जाचक संकटातून बाहेर पडण्याचा नवा मार्ग शोधला आहेत.उत्तर महाराष्ट्रातील शेतीतील सर्वात मोठा प्रयोग करण्यात यश मिळाले आहे .

  द्राक्ष शेती ही दिवेसंदिवस अत्यंत जोखीमदारीची ठरत असताना द्राक्ष पिकाला पाण्याचे योग्य नियोजन करण्याकरिता येतील निफाड रस्त्यावर रानमळ्यात मोरे यांनी साडेसहा लाख रुपये या सौरपंप बसविण्यासाठी खर्च केला असून, यावर दिवसातील ८ ते ९ तास अविरत साडेसात हॉर्स पाॅवर असणारी मोटर चालते. ग्रामीण भागात वीजमंडळाकडून सतत होणारे भारनियमन रोहित्र खराब झाल्यानंतर दुरुस्तीत होणार विलंब या सगळ्या त्रासावर काय तोडगा काढावा या विचारात असण्याऱ्या प्रभाकर मोरे यांना त्याच्या काही मित्राकडून सौरऊजेच्या तंत्राचा वापर करण्याचा सल्ला मिळाला. पुढे याकरिता शोध घेत असतानाच नाशिक येथील निखिल टर्ले व महेश गडाख या दोन तरुणांची भेट झाली. त्यानंतर लोडशेडिंगवर पर्याय काढण्याच्या प्रश्नावर या दोन तरुणांनी सौरपंप विषयक सर्व अभ्यासपूर्वक बाबी जाणून घेऊन मोरे यांच्या द्राक्ष बागेत साडेसात हॉर्सपावरची मोटार चालेल असे डायरेक्ट पाॅवर सप्लाय उपलब्ध करून देणारा पंप बसवून दिला आज या पंपाच्या मदतीने द्राक्षशेतीला योग्य नियोजन करून३५ एकर द्राक्ष बागेला पाणी दिले जात आहे. उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा सर्वात मोठा उपक्रम मोरे यांच्या द्राक्ष बागेत राबविला गेला आहे.
  १५ बाय २० च्या जागेत बसविण्यात आलेल्या या सौरपंपात ३० सौर पॅनल बसविण्यात आले आहेत. या प्रकारच्या सौरपंप उभारणीला प्रति हॉर्सपावर ९० हजार खर्च करण्यात आला आहेत. द्राक्ष पीक हे पूर्णपणे पाण्याच्या नियोजनावर अवलंबून असते अशातच लोडशेडिंग मध्ये विजेअभावी रात्रीच्या वेळेला पाणी द्यावे लागायचे मात्र आता या नव्या सौरपंपामुळे दिवसा योग्य पाणी देणे शक्य होतअसल्याने आर्थिक नुकसान कमी होऊन वेळेची बचत होत होणार आहे . द्राक्ष उत्पादकांना एक नवा पर्याय मोरे यांनी यातून उभा केला आहे.

  कसा आहे हा सौर पंप द्राक्ष शेतीला
  प्रभाकर मोरे यांच्या द्राक्ष बागेत बसविण्यात आलेल्या सौरपंपात ३० सौर पॅनल बनविण्यात आले आहेत. मुख्य बाब म्हणजे या पंपाला जोडण्यात आलेली मोटार ही साध्या स्वरूपाची असून, इतर सौर पंपासारखी सौरमोटर घेण्याची गरज नाही. द्राक्ष ड्रीपकरिता लागणारा दाब लक्षात घेता पाण्याला चागला दाब कसा निर्माण होईल, यांची काळजी घेण्यात आहेत.

  विजेच्या संकटातून मुक्तता
  द्राक्ष शेती करत असताना पाण्याच्या नियोजनासाठी विजेअभावी मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागले आज सौरपंप बसविल्यामुळे तो ताण कमी झाला आहेत आता रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत नाही तसेच लिक्विड खते देखील वेळेवर देता येतात. शेतकरी वर्गाला जर विजेच्या जाचक संकटातून बाहेर पडायचं असेल तर नक्कीच हा प्रकल्प करायला हरकत नाही.मात्र या प्रकपाला खर्च अधिक असल्याने सरकारने सबसिडी द्यायला हवीत -प्रभाकर मोरे ,द्राक्षउत्पादक पिंपळगाव बसवंत

  विनाकारण होणारा खर्च टळतो
  सौर पंपामुळे वेळेवर वीज उपलब्ध झाल्यामुळे दरवर्षी हजारो रुपये वीजबिल भरून देखील वेळेवर वीजपुरवठा होत नाही आणि वीजबिल तर भरावे लागते तो खर्च आता द्राक्ष उत्पादक मोरे यांचा टाळणार आहे

  प्रेशर मेंटेन करण्यात यश
  सौरपंप बसवतांना जास्तीत जास्त दाब कसा निर्माण होईल याची काळजी घेतली त्यात चांगले यश प्राप्त झाले त्यामुळे एकावेळी जास्त द्राक्ष बागांना पाणी देणे शक्य होते, असे क्रॅनोवेटिव्ह पावरटेकचे संचालक निखिल टर्ले यांनी सांगितले.