सिडकोत नासर्डी नदीत बुडून बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

रवी पाण्यात उतरला त्यावेळी जवळच राहणारे आजींनी ओरडून त्या मुलांना पाण्यात उतरू नये, असे सांगितले. आंजीच्या सांगण्यावरुन दोन जण काठावरच थांबले. परंतु पाण्यात उतरलेल्या रवीला पाण्याचा व खोलीचा अंदाज आला नाही, तो पाण्यात बुडाला. यावेळी परिसरातील नागरिक जमा होऊन त्याला पाण्यातुन काढले. त्याला रुग्णालयात नेले असतांना डॉकटरांनी त्याला मृत घोषीत केले.

    सिडको : उंटवाडी स्मशानभुमी जवळील नासर्डी नदीत पोहोण्यासाठी गेलेला बारा वर्षाच्या मुलाला खोलीचा अंदाज न आल्याने बुडून दुर्देवी मृत्य झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत मुलाचे नाव यश रवी जाधव आहे.याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, सिडकोतील शिवशकती चौकजवळ शिवनगर येथील राहणारा यश रवी जाधव (१२) हा दोन मित्रांसमवेत शुक्रवारी दुपारी उंटवाडी स्मशानभुमी जवळ असलेल्या नासर्डी नदीत पोहोण्यासाठी गेले.

    यावेळी प्रथम रवी पाण्यात उतरला त्यावेळी जवळच राहणारे आजींनी ओरडून त्या मुलांना पाण्यात उतरू नये, असे सांगितले. आंजीच्या सांगण्यावरुन दोन जण काठावरच थांबले. परंतु पाण्यात उतरलेल्या रवीला पाण्याचा व खोलीचा अंदाज आला नाही, तो पाण्यात बुडाला. यावेळी परिसरातील नागरिक जमा होऊन त्याला पाण्यातुन काढले. त्याला रुग्णालयात नेले असतांना डॉकटरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यकत करण्यात येत आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार राऊत करीत आहेत