भूमिगत पाईपलाईन ठरतेय जीवघेणी ; ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे

सध्या नाशिक शहरात सर्वत्र गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. पाइप पाइप टाकल्यानंतर खोदलेले खड्डे हे तात्पुरत्या स्वरुपात बुजवल्याने मातीचा ढिगारा तयार झाल्याने खडी मिश्रित माती रस्त्यावर पसरलेली आहे.

    सिडको : सध्या नाशिक शहरासह उपनगरात स्वयंपाकाच्या भूमिगत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी खोदलेले रस्ते व्यवस्थित न बुझविल्यामुळे रस्त्यावर माती पसरल्याने वाहने घरंगळून अपघात होत आहे. संबंधित ठेकेदारास सांगितले असता उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

    सध्या नाशिक शहरात सर्वत्र गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. पाइप पाइप टाकल्यानंतर खोदलेले खड्डे हे तात्पुरत्या स्वरुपात बुजवल्याने मातीचा ढिगारा तयार झाल्याने खडी मिश्रित माती रस्त्यावर पसरलेली आहे. या मार्गावरून जा ये करणारे वाहने घरंगळून अपघात होत आहे. बुजवलेल्या मातीवर पाणी टाकून ती भुईसपाट पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी संतोष भांदुर्गे, शिवा तेलंग, सागर देशमुख, प्रविण जाधव, याेगेश पवार, ऋशी वर्मा, प्रकाश खाेडे आदींनी केली आहे.