दुर्दैवी घटना! सेल्फी काढणाऱ्या सख्ख्या भावांचा मृत्यू

परिसरात असलेल्या नागरिकांच्या मदतीने त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात येऊन शवविच्छेदनसाठी सामान्य रुग्णालय मालेगाव येथे आणण्यात आले होते. हर्षल हा नाशिक येथे इंजिनिअरिंगच्या दुस-या वर्षाला तर लहान दिनेश हा मालेगावी मसगा महाविद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता.

    मालेगाव : तालुक्यातील विराणे येथील धरणात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हर्षल देविदास जाधव (२२) व रितेश देविदास जाधव (१८) रा.अजंग ता.मालेगाव हे विराणे येथील धरणाच्या पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

    निमशेवडी येथे हर्षल आणि रितेश हे दोघे बुधवारी एका विवाहसोहळ्यसाठी दुचाकीवर गेले होते. दुपारी घरी परत येत असतांना रस्त्यावरील विराणे धरणाजवळ दोघे भाऊ गेले. यावेळी धरणाच्या काठावरील उतारावरून लहान भाऊ रितेश याचा पाय घसरल्याने तो धरणात बुडला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ हर्षलने प्रयत्न केले. परंतु दोघांना पोहता येत नसल्याने ते धरणात बुडाले. दरम्यान त्यांचा चुलत भाऊ मागून येत असतांना त्याचे लक्ष दुचाकीकडे गेल्याने हा प्रकार लक्षात आला. यावेळी परिसरात असलेल्या नागरिकांच्या मदतीने त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात येऊन शवविच्छेदनसाठी सामान्य रुग्णालय मालेगाव येथे आणण्यात आले होते. हर्षल हा नाशिक येथे इंजिनिअरिंगच्या दुस-या वर्षाला तर लहान दिनेश हा मालेगावी मसगा महाविद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता.