वणी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षकांची उचलबांगडी

दिंडोरी, चांदवड व सुरागाणा या तीन तालुक्यातील रुग्णांबरोबर वणी परिसरातील खेड्यापाड्यातील रूग्ण वणी ग्रामीण रुग्णालयात तपासणी व उपचारासाठी येतात. नुकत्याच झालेल्या पिंपळगाव-सुरत हा राष्ट्रीय महामार्ग वणीमार्गे जातो. तसेच वणी-नाशिक, वणी-सापुतारा, वणी-पिंपळगाव, वणी-कळवण या मार्गावर असलेल्या लक्षणीय वाहतुकीमुळे अपघातांची संख्या सातत्याने वाढते आहे.

    वणी : ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य िवभागाकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नियोजन करण्यात येते; मात्र निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी वणी ग्रामीण रुग्णालयाच्या कार्य प्रणालीबाबत केंद्रीय अाराेग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे गंभीर तक्रारी करण्यात अाल्या हाेत्या. त्याची दखल घेत त्यांची उचलबांगडी करण्यात अाली असून, त्यांच्या जागी नवीन अधिक्षकांची िनयुक्ती करण्यात अाली अाहे.

    रुग्णसेवेवर ताण
    दिंडोरी, चांदवड व सुरागाणा या तीन तालुक्यातील रुग्णांबरोबर वणी परिसरातील खेड्यापाड्यातील रूग्ण वणी ग्रामीण रुग्णालयात तपासणी व उपचारासाठी येतात. नुकत्याच झालेल्या पिंपळगाव-सुरत हा राष्ट्रीय महामार्ग वणीमार्गे जातो. तसेच वणी-नाशिक, वणी-सापुतारा, वणी-पिंपळगाव, वणी-कळवण या मार्गावर असलेल्या लक्षणीय वाहतुकीमुळे अपघातांची संख्या सातत्याने वाढते आहे. तसेच मारामाऱ्या, सर्पदंश, आत्महत्या, गरोदर महिलांना सेवा याचाही अतिरिक्त ताण रुग्णसेवेवर आहे.

    डाॅ. अनंत पवारांची िनयुक्ती
    या दरम्यान विविध स्वरूपाच्या आजारांनी त्रस्त रुग्णांचाही वाढता राबता आरोग्यसेवेची कसोटी पाहणारा असल्याबाबत दुमत नाही .दरम्यान गेल्या काही कालावधीपासुन वणी ग्रामीण रुग्णालयातील रूग्णसेवेचे तीनतेरा वाजले होते विविध स्वरूपाच्या गंभीर तक्रारी करुनही कार्यवाही होत नसल्याने अखेर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी याबाबत लक्ष घातले व स्वीय सहाय्यक डाॅ. प्रशांत खैरे, जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. अशोक थोरात, नारायण गावित यांना याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सूचित केले. त्यांच्यासमवेत भाजप उपतालुका प्रमुख महेंद्र पारख, किरण गांगुर्डे, सतिश जाधव, कुंदन जावरे यांनी वस्तूसि्थती िनदर्शनास अाणून दिली. दैनिक नवराष्ट्रने याबाबत वेळोवेळी वृत्त प्रकाशीत केले. या सर्वांची दखल डाॅ. भारती पवार यांनी घेतली. अापल्या स्वीय सहाय्यक यांना आदेश देत कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. अनंत पवार यांची नियुक्ती केली. अनंत पवार यांनी वणी ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी वैद्यकीय अधिकारी या पदावर काम केले आहे. त्यांना येथील रुग्णसमस्यांची जाण असल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.