
येथे कालसर्प पूजा करण्यावरून हा भयंकर राडा झाला. त्यातील एकाने तर चक्क गावठी पिस्तुल, तलवारी, चाकू, कोयते बाहेर काढले. त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरून गेले. कालपर्यंत चक्क मुखी रामनाम असणारे आज असे एकदम आक्रमक झालेले पाहून ते चाट पडले. करणार काय. सारा मायेचा खेळ. फक्त यातून जे आता भाविकांनी काय बोध घ्यायचा, तो ज्यांनी-त्यांनी ठरवावे. या प्रकरणी सात संशयितांना पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्र्यंबकेश्वरला पूजा विधी करण्यासाठी आलेल्या यजमानांना पळविल्याच्या कारणावरुन ही घटना घडल्याची माहिती आहे.
नाशिक : नाशिकच्या पंचवटी येथे पुराणकाळातलं मंदिर आहे. तिथे कुंभमेळा भरवतो. दररोज हजारो पर्यटक पंचवटीला भेट देतात. विशेष म्हणजे पंचवटी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहित किंवा पुजाऱ्यांचं वास्तव असतं. भाविक त्यांना वंदन करुन त्यांचे आशीर्वाद घेतात. पण लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या याच पंचवटीत एक विचित्र घटना समोर आली आहे. पंचवटीत पुजारींच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथे कालसर्प पूजा करण्यावरून हा भयंकर राडा झाला. त्यातील एकाने तर चक्क गावठी पिस्तुल, तलवारी, चाकू, कोयते बाहेर काढले. त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरून गेले. कालपर्यंत चक्क मुखी रामनाम असणारे आज असे एकदम आक्रमक झालेले पाहून ते चाट पडले. करणार काय. सारा मायेचा खेळ. फक्त यातून जे आता भाविकांनी काय बोध घ्यायचा, तो ज्यांनी-त्यांनी ठरवावे.
या प्रकरणी सात संशयितांना पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्र्यंबकेश्वरला पूजा विधी करण्यासाठी आलेल्या यजमानांना पळविल्याच्या कारणावरुन ही घटना घडल्याची माहिती आहे. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तात्काळ अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून हस्तक्षेप करत ही हाणामारी रोखली. तर पुजाऱ्यांच्या मोटारीची पोलिसांनी झडती घेतली असता कारमधून एक गावठी कट्टा व अकरा जीवंत काडतुसे हे पोलिसांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
या आरोपींना ठोकल्या बेड्या
पोलिसांनी याप्रकरणी वीरेंद्र हरिप्रसाद त्रिवेदी, आशिष वीरेंद्र त्रिवेदी, मनीष वीरेंद्र त्रिवेदी, सुनील आदित्यप्रसाद तिवारी, आकाश नारायण त्रिपाठी, अनिकेत उमेर तिवारी, सचिन नागेंद्र पांडे यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याविरोधात शस्त्र अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.