“माझ्या मित्राला तु मिठी का मारली?” म्हणत युवकाने चोपरने केला प्राणघातक हल्ला

भूषण काळे हनुमान नगर येथील राहणारा युवक आहे. या आधी देखील या युवकावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या घटने बाबत अधिक माहिती पंचवटीतील सद्गुरु हॉस्पिटल रुग्णालयात दाखल असलेल्या दीपक वाघमारे यांनी दिली.

    नाशिक : नाशिक पंचवटीतील आडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अमृतधाम परिसरात दिपक वाघमारे ह्या युवकावर रात्री दीड वाजता प्राणघातक हल्ला करण्यात आला. “माझ्या मित्राला तु मिठी का मारली ?” यावरून दीपक वाघमारे या युवकावर परिसरात राहणाऱ्या भूषण काळे या युवकाने चोपरने प्राणघातक हल्ला केला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण काळे हनुमान नगर येथील राहणारा युवक आहे. या आधी देखील या युवकावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या घटने बाबत अधिक माहिती पंचवटीतील सद्गुरु हॉस्पिटल रुग्णालयात दाखल असलेल्या दीपक वाघमारे यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीला ताब्यात घेतले आहे