Currently there is no such thing as a lockout, the government should consider the opposition as well; Appeal of Devendra Fadnavis

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. तसेच अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. मात्र जिथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तिथे जाऊन तरी काय करायचे? असा सवाल त्यांनी आयोजकांना केला आहे.

    नाशिक शहरात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला माझ्या शुभेच्छा आहेत. जेथे आमच्या विचारांचा अपमान होत असेल, योग्य तो सन्मान होणार नसेल तर तेथे जाऊन करायचे तरी काय? अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ट‌्वीटरद्वारे केली आहे. त्यामुळे नाशिक दौऱ्यात फडणवीस साहित्य संमेलनाला भेट देणार नाहीत, हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

    जाऊन करायचे तरी काय?

    संमेलनाच्या निमंत्रण पत्रिका तसेच निमंत्रण देण्यावरून महापौरांनी आधीच बहिष्कारास्त्र उगारले होते. ग्रंथदिंडीला महापौर कसेबसे उपसि्थत राहिले. मात्र, फडणवीस नाशिक दौऱ्यात संमेलनस्थळाला भेट देणार की नाही, याबाबत साशंकता होती. आता त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे.

    ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. तसेच अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. मात्र जिथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तिथे जाऊन तरी काय करायचे? असा सवाल त्यांनी आयोजकांना केला आहे.

    सावरकरांवरून कानउघडणी

    सावकारांच्या नावावरून देखील त्यांनी आयोजकांची कानउघडणी केली आहे. ते म्हणाले की, ‘या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचा महिमा कमी करण्याचा प्रयत्न होतोय का? असो, आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. असं देखील फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.