माय मराठीच्या सेवेसाठी स्वयंसेवक सज्ज ! सारस्वतांचे आवाहन

समिती प्रमुख प्राचार्य डॉ. संतोष मोरे यांनी संमेलनासाठी काम करत असलेल्या इतर समित्यांची स्वयंसेवकांना माहिती करून दिली व साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असल्यामुळे मातृभाषेचे सेवक होण्याची सुवर्णसंधी असल्याचे स्वयंसेवकांना उत्साह व जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.

    नाशिक (Nashik) :  ९४ व्या साहित्य संमेलना निमित्त स्वयंसेवक निवड ,देखरेख व कार्यशाळा समितीच्या वतीने स्वयंसेवकांची बैठक कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी आडगाव येथे 11 ते 3 या वेळेत झाली. संमेलन गीताने बैठकीला सुरुवात झाली.

    भुजबळ नॉलेज सिटी येथील तंत्रनिकेतन ,अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी कॉलेज तसेच भुजबळ ॲकॅडमी येथील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच मातोश्री महाविद्यालय येथील स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

    यावेळी समिती उपप्रमुख भूषण काळे यांनी स्वयंसेवकांना संमेलनाच्या कार्यक्रम स्थळांची प्रत्यक्ष भेट देऊन माहिती करून दिली. ग्रंथदिंडीचे समिती प्रमुख विनायक रानडे व मंगेश पंचाक्षरी यांनी ग्रंथदिंडी नियोजनाविषयी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. स्वयंसेवकांना वेळेचे नियोजन ,टीम वर्क ,संवाद कौशल्य याबाबत अभय बाग यांनी मार्गदर्शन केले.

    समिती प्रमुख प्राचार्य डॉ. संतोष मोरे यांनी संमेलनासाठी काम करत असलेल्या इतर समित्यांची स्वयंसेवकांना माहिती करून दिली व साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असल्यामुळे मातृभाषेचे सेवक होण्याची सुवर्णसंधी असल्याचे स्वयंसेवकांना उत्साह व जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.

    मातृभूमी प्रमाणे मातृभाषेची सेवा करण्याची यानिमित्ताने सर्वांना संधी प्राप्त झाली आहे असे प्राचार्य डॉ संतोष मोरे यांनी सांगितले. यावेळी समिती पालक पेठे विद्यालयाचे माजी प्राचार्य रमेश देशमुख ,मेट महाविद्यालयाचा स्टाफ कॉर्डिनेटर अनिल गोसावी ,विनोद टवलारकर तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी विष्णू बागुल, एडवोकेट वाणी व आपत्ती व्यवस्थापन प्रतिनिधी किरण पगार उपस्थित होते.