पत्नीचे अपहरण करून खून करणाऱ्यास अटक, आरोपी पतीला पाच दिवसांची पोलीस कोठडी; ‘असा’ लावला गुन्ह्याचा छडा

ड तालुक्यातील खडकी येथे पत्नीला मारहाण करून अपहरण करून पत्नीचा खून केलेल्या आरोपी संतोष पवार याला दौंड पोलीस न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.

    पाटस : दौंड तालुक्यातील खडकी येथे पत्नीला मारहाण करून अपहरण करून पत्नीचा खून केलेल्या आरोपी संतोष पवार याला दौंड पोलीस न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. खडकी येथील संतोष अहिऱ्या पवार याने त्याची पत्नी सुरेखा हीला १९ मे रोजी मारहाण करून अपहरण करून नंतर तिचा खून करून मृतदेह लोणारवाडी गावच्या हद्दीत उसाच्या शेतात टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी अपहरणाची तक्रार दाखल होताच तपासाची सूत्रे हलविली.

    अपहरण केल्याच्या गुन्ह्याचा छडा लावला

    अवघ्या चार दिवसाच्या आत मृतदेह शोधून काढत अपहरण केल्याच्या गुन्ह्याचा छडा लावला. या प्रकरणी आरोपी पती संतोष पवार याला गुरुवारी (दिनांक २५) दौंड न्यायालयात हजर केले असता दौंड न्यायालयाने अधिक तपासासाठी ५ दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.

    गुन्ह्याचा छडा लावत मृतदेह शोधून काढला

    या प्रकरणाचा दौंड पोलीस ठाण्यात २० मे रोजी अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवघ्या चार दिवसांच्या आत दौंड पोलिसांनी आरोपी ला ताब्यात घेत या गुन्ह्याचा छडा लावत मृतदेह शोधून काढला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस उपनिरीक्षक अमितसिंह पाटील. सहाय्यक उपनिरीक्षक कोकरे,राजु मोमीन राजापुरे, पोलीस नाईक असिफ शेख, पोलीस उपनिरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंभार, पोलीस हवालदार सुभाष राऊत, पोलीस हवालदार जे.एन. मलगुंडे, पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, पोलीस हवालदार विठ्ठल गायकवाड, पोलीस हवालदार गावडे, पोलीस नाईक अमीर शेख, पोलीस नाईक शरद वारे, शैलेश हंडाळ, भागवत, पोलीस शिपाई सागर गलांडे, योगेश गोलांडे, अमोल देवकाते आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

    दरम्यान, दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि त्यांच्या टीमने तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या दिवसाच्या आरोपी ताब्यात घेत या गुन्ह्याचा गुन्ह्याचा छडा लावल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या पोलीस पथकांचे विशेष कौतुक केले आहे.