मीरारोडमध्ये 35 लाखांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचं अपहरण आणि हत्या

पोलिसांनी तपासा करत फोन कॉलच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अफजल आणि इरफान असे या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत

    मुंबई : दोन दिवसापुर्वी खंडणीसाठी (Extortion) अपहरण (Kidnapping) करण्यात आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. मीरारोड परिसरातील ही धक्कादायक घटना असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोना आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची खुनाची कबुलीही दिली आहे.

    मीरारोड परिसरात खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या 14 वर्षीय मुलाची हत्या (murder) करण्यात आली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हत्या करण्यात आलेला मुलगा हा दोन दिवसांपूर्वी आपल्या घरातून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी काश्मिरा पोलीस (Police) ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र आता त्याची त्यानंतर हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांनी खूनाची कबुली देखील दिली आहे. अफजल आणि इरफान असे या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ओळखीचा फायदा घेत आरोपींनी या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली.

    फोन कॉलच्या आधारे आरोपी सापडले

    पोलिसांनी तपासा करत फोन कॉलच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अफजल आणि इरफान असे या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. नायगावमध्ये या मुलाची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.