प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    कल्याण – महिला रिक्षा प्रवाशाचे अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून नग्न अवस्थेत तिला धावत्या रिक्षातून फेकून दिल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत शुक्रवारी रात्री घडली. महिलेचे दैव बलवत्तर म्हणून त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या प्रसंगवधानामुळे मोठा अनर्थ टळला.

    दोन नराधमांच्या मुसक्या आवळल्या

    दरम्यान, पाठलाग करीत पोलिसांनी रिक्षाचालकासह दोन नराधमांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे रिक्षातील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    प्रभाकर पाटील (वय 22), वैभव तरे (वय 19) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

    शुक्रवारी 8 सप्टेंबर रोजी रात्री 10.45 वाजता खिडकाळी बस स्टॉपवरून कोळेगाव येथे घरी जाण्यासाठी एका महिलेने आरोपी प्रभाकर पाटील याची  रिक्षा पकडली. यावेळी रिक्षामध्ये आरोपी वैभव तरे आधीच बसला होता.

    मात्र कोळेगाव येथे रिक्षा न थांबवता या दोघांनी स्क्रू ड्रायव्हरचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. माय सिटी या निर्जनस्थळी रिक्षा नेऊन त्या महिलेला विवस्त्र करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.