Kidnapping of an 8-year-old boy while playing in the yard, excitement in Vadgaon Nagar Panchayat area

  पुणे, मावळ : अंगणात खेळत असलेल्या 8 वर्षाच्या बालकाला अज्ञात कारणासाठी अज्ञात इसमांनी फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवारी (दि.7) दुपारी 2 वा. रेल्वे स्टेशन जवळ, वडगाव नगरपंचायत ता.मावळ जि. पुणे हद्दीत घडली. वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये सुनीता सुपेकर यांनी फिर्याद दिली.

  समर बाळू कराळे (वय 8 वर्ष 9 महिने) रा. रेल्वे स्टेशन जवळ, वडगाव नगरपंचायत ता. मावळ असे बेपत्ता झालेल्या बालकाचे नाव आहे.

  अज्ञात इसमांनी फूस लावून पळवून नेल्याची घटना

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगणात खेळत असलेल्या समर कराळे याला अज्ञात कारणासाठी अज्ञात इसमांनी फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवारी (दि.7) दुपारी 2 वा. घडली त्याचा सर्वत्र शोध घेतला असता, तो मिळून आला नाही. तो येथील पुणे जिल्हा परिषदेत शाळेत इयत्ता तिसरीत आहे.

  बालक सापडल्यास या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

  वर्णन पुढीलप्रमाणे रंग सावळा, उंची 4 फूट, बांधा सडपातळ, नेसणीस लाल रंगाचा टी शर्ट, निळ्या रंगाची हॉफ पॅन्ट, केस बारीक काळे, पायात पिवळ्या रंगाची स्लीपर. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार अजित ननावरे करत आहेत. बालक सापडल्यास खालील 7385258505 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.