horrible udaipur crime news murderer kills 8 year old girl after watching porn cuts body to pieces with knife in rajasthan nrvb

खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या दोघा भावांना अज्ञात व्यक्तीने पळविले. शिवराज गणेश वाईकर ( वय १२ ) व विराज गणेश वाईकर (वय ९, दोघेही सद्या रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ) अशी त्यांची नावे आहेत. दर्शन आप्पासाहेब कोरडे यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    शिरोली : खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या दोघा भावांना अज्ञात व्यक्तीने पळविले. शिवराज गणेश वाईकर ( वय १२ ) व विराज गणेश वाईकर (वय ९, दोघेही सद्या रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ) अशी त्यांची नावे आहेत. दर्शन आप्पासाहेब कोरडे यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांकडून मिळालेली माहितीनूसार, शिवराज व विराज हे दोघेही पेठवडगावच्या आश्रम शाळेत राहतात. सद्या शाळेस सुट्टी असल्याने ते दोघेही पुलाची शिरोली येथे घरी आले होते. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता दोघेही खेळण्यासाठी घराबाहेर पडले. बराच वेळ ते घरी आले नाहीत म्हणून दर्शन त्यांना शोधू लागले. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांना घेऊन गेल्याचे समजले. काही वेळ त्यांनी शोध घेतला. पण ते मिळत नसल्याने अखेर त्यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.