
दगडाने ठेचून युवकाचा खून करण्यात आल्याची थरारक घटना लालखेडाजवळच्या परसोडी दीक्षित येथे उघडकीस आली. युवकाच्या प्रायव्हेट पार्टवर दगडाने वार करण्यात (Crime in Nagpur) आल्याचे आढळले. पोलिसांना प्रारंभीपासूनच अनैतिक संबंधातून घटना घडल्याचा संशय होता. त्याच दिशेने तपास करत अवघ्या दोन तासांमध्येच पोलिसांनी घटनेचा उलगडा केला.
जलालखेडा : दगडाने ठेचून युवकाचा खून करण्यात आल्याची थरारक घटना लालखेडाजवळच्या परसोडी दीक्षित येथे उघडकीस आली. युवकाच्या प्रायव्हेट पार्टवर दगडाने वार करण्यात (Crime in Nagpur) आल्याचे आढळले. पोलिसांना प्रारंभीपासूनच अनैतिक संबंधातून घटना घडल्याचा संशय होता. त्याच दिशेने तपास करत अवघ्या दोन तासांमध्येच पोलिसांनी घटनेचा उलगडा केला. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्यानेही हत्येची कबुली दिली आहे.
उमेश खंडार (वय 35) असे मृताचे तर रवींद्र घारपुरे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दोघेही परसोडी दीक्षित येथील रहिवासी आहेत. गावातील नाल्यात उमेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती शनिवारी सकाळी अख्या गावात पसरली. माहिती मिळताच जलालखेडा पोलिस दाखल झाले. ठाणेदार मनोज चौधरी यांच्या नेतृत्वात तपासचक्र जलदगतीने फिरविण्यात आले. श्वान पथकाकडून घटनास्थळाची तपासणी करण्यात आली.
मृताच्या शरीरावरील जखमांवरून घटनेमागे अनैतिक संबंधाचा अँगल असल्याची शंका पोलिसांना प्रारंभीपासूनच होती. त्याच दिशेने तपासचक्रे फिरविली असता रवींद्र घारपुरे याचे नाव समोर आले. घटनेपासून तोसुद्धा बेपत्ता असल्याने पोलिसांची शंका बळावली. तांत्रिक पद्धतीने लोकेशन घेतले असता तो आमनेर येथे असल्याचे लक्षात आले.
तातडीने पथक रवाना झाले. त्याला अटक करण्यात आली. खाक्या दाखविताच त्याने हत्येची कबुली दिली. मृतक आपल्या पत्नीला त्रास देत असल्याने त्याचा खून केल्याचे त्याने मान्य केले. अवघ्या 2 तासांमध्येच खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.