कल्याणात लॉजमध्ये हत्या? संशयित तरुणाच्या शोधात पोलीस

कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉज मधील एका रूममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्योती तोरडमल असा या महिलेचे नाव असून ती घाटकोपर येथे राहत होती.

    कल्याण : शहरात दुहेरी हत्याकांडाला दहा दिवस उलटत नाही, तोपर्यत आता स्टेशन परिसरातील तृप्ती लॉज मधील एका रूममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ज्योती तोरडमल असा या मयत महिलेचे नाव असून ती एका इसमासोबत काल दुपारच्या सुमाराच्या लॉजमध्ये आली होती. आज सकाळच्या सुमारास मृतदेह आढळून आला आहे. तिच्यासोबत असलेला इसम भूपेंद्र गिरी हा फरार झाला आहे. या महिलेची हत्या झाल्याचा संशय असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

    कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉज मधील एका रूममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्योती तोरडमल असा या महिलेचे नाव असून ती घाटकोपर येथे राहत होती. ज्योती तोरडमल ही भूपेंद्र गिरी नावाच्या एका इसमासोबत शनिवारी दुपारच्या सुमारास स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजवर आली होती. आज सकाळी बराच वेळ झाला मात्र दरवाजा उघडत नसल्याने लॉज मधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा ज्योतीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ महात्मा फुले पोलिसांना याबाबत माहिती दिली.

    महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला आहे. ज्योतीच्या सोबत आलेला भूपेंद्र गिरी हा पसार झाला आहे. ज्योतीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. फरार झालेल्या भूपेंद्र गिरी याच्या शोधासाठी पोलिसांचे दोन पथक तैनात आहेत.