kirit somaiya press conference

किशोरी पेडणेकर यांनी एसआरएसंदर्भात (SRA Fake Agreement) केलेले तीन करार खोटे आहेत. अनिल परब यांनी सदानंद कदमसोबत करार केला त्यांनीही असंच फ्रॉड, फोर्जरी आणि चिटिंग केलं आहे. संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांनीही तसंच केलं आहे, असे आरोप आज किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहेत.

    मुंबई: उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी फसवणूक कशी करावी, फ्रॉड कसा करावा? या सगळ्याची मोनोपली घेतली आहे,असं भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटलं आहे. किशोरी पेडणेकर यांनी एसआरएसंदर्भात (SRA Fake Agreement) केलेले तीन करार खोटे आहेत. अनिल परब यांनी सदानंद कदमसोबत करार केला त्यांनीही असंच फ्रॉड, फोर्जरी आणि चिटिंग केलं आहे. संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांनीही तसंच केलं आहे, असे आरोप आज किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहेत. इतकंच नाही तर अशा व्यवहारांमध्ये बरबटलेल्या किशोरी पेडणेकरांना उद्धव ठाकरेंनी महापौरपद कसं दिलं? असाही प्रश्न किरीट सोमय्यांनी विचारला आहे.

    ते पुढे म्हणाले की, मी आता देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की या तिघांकडे लक्ष द्या. फॉर्जरी करणं, खोटे करार करणं, लोकांना फसवणं असं ही लोक करत आहेत. किशोरी पेडणेकरांनी लिव्ह अँड लायसन्स केलं आहे ते २०१७ मध्ये झालेलं आहे. हा करार संजय अंधारी यांच्यासोबत झाला. या करारावरची संजय अंधारी यांची सही खोटी आहे. फोर्जरी केल्याचं संजय अंधारी यांनी कबूल केलं असल्याचंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

    एकाच जागेचे दोन करार
    असाच एक करार त्याच जागेचा हा किशोरी पेडणेकरांनी केला. किशोरी पेडणेकर आणि उद्धव ठाकरे हे काहीही करू शकतात. आत्ता जी चौकशी सुरू झाली त्यानंतर हा करार त्यांनी SRA आणि मुंबई महापालिकेला दिला. याच जागेचा सेम मजकूर २०१७ च्या करारातही आहे. संजय अंधारी एकाच जागेचा २०१७ मध्ये एक करार करतात दुसरा करार १२ ऑगस्ट २०१७ ला सगळं तेच तेच या ठिकाणी आहे. एकाच जागेचे दोन करार कसे केले? असले चुकीचे करार करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी महापौर कसं काय केलं? या दोन करांरांमध्ये एक खरे संजय अंधारी आहेत दुसरे खोटे संजय अंधारी आहेत जे किशोरी पेडणेकरांनी उभे केले आहेत. असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

    मुंबई महापालिकेने गोमाता जनता एसआरए गाळा क्रमांक ५ गंगाराम बोगा याला दिला. तो आला आणि करार कुणी केला? यासंबंधीचा करार शिवप्रसाद तिवारी आणि किशोरी पेडणेकर यांच्यात झाला. कसा काय? हा करार ७ ऑगस्ट २०१२ ला झाला. गाळा देण्यात आला आहे मोगाला करार झालाय किशोरी पेडणेकर आणि तिवारी यांच्यात. हा करार झाला ऑगस्ट २०१२ मध्ये नोटरी केली २६ ऑगस्ट २०१३ ला. उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणून ही माफियागिरी करायची याचंच नाव उद्धव ठाकरे सेना. अशा व्यक्तींना उद्धव ठाकरे माफही करतात. यासंदर्भात किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी मी करणार आहे असंही किरीट सोमयांनी म्हटलं आहे.