नवनीत राणा आणि रवी राणा यांना आत टाकण्याची सुपारी संजय पांडे यांनी घेतली होती का? – किरीट सोमय्या

यापुढे अजून होऊ शकतात, हिरेन प्रकरणात कोण कोणते अधिकारी होते ते उघड करणार. यशवंत जाधव प्रकरणाचा पाठपूरावा करण्यासाठी गेलो होतो, येत्या 15 दिवसात यात देखील काही घडामोडी आपल्याला दिसून येतील. केंद्रीय तपास यंत्रणांना धमक्या दिल्या जात आहेत, तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकतात अशी धमकी शिवसेनेकडून केंद्रीय यंत्रणांचा तपास अधिकाऱ्यांना दिल्या जात आहे.

    ठाणे : मनसुख हिरेन यांच्या परिवाराला आता थोडी स्वास्थ वाटते, आज खूप विस्तृत चर्चा त्यांनी केली. त्यांना आधी भीती वाटत होती, कारण ठाकरे सरकार यांनी हिरेन हा वसुलीखोर आहे, असे चित्र निर्माण केले होते, मी आता एनआयएकडे मागणी करणार आहे की या दोघांना पुन्हा पोलीस दलात आणण्यांची चौकशी केली पाहिजे. मुख्य सूत्रधार वझे, शर्मा होते. आज कोर्टात हे फायनल झालं, एन आय ए ने संगीतला की हिरेन हा विक्टिम आहे, नियुक्ती संदर्भात एक फाईल अजून गायब आहे. यानां वसुली करून घ्यायची होती म्हणून या दोघांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यानी गैर कानूनी पद्धतीने नियुक्ती केली गेली. राजद्रोहचा गुन्हा दाखल होऊच शकत नाहीत आता ज्याने हा गुन्हा लावला त्यावर कारवाई होणार ना?त्यामुळे संजय पांडे आणि दिलीप वळसे पाटील यांनी आता उत्तर द्यावे नवनीत आणि रवी यांना आत टाकण्याची सुपारी संजय पांडे यांनी घेतली होती का? अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टिका केली.

    नगराळे यांची बडली का केली गेली? . एक प्रदर्शन आम्ही प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत, यांचे पोलखोल आम्ही करू. गेली अनेक वर्षे माफिया सेना या ठाणे महापालिकेत सत्तेत आहे. अनेक वर्ष घोटाळे झाले, आता गेल्या 5 वर्षात जे घोटाळे झाले, त्याची एक काळी पुस्तिका भाजप काढणार आहे. मुंबई प्रमाणे ठाण्यात देखील पोलखोल सभा होणार, 50 प्रकारचे घोटाळे आहेत, ते सर्व नागरिकांसमोर आम्ही आणू, पुढच्या आठवड्यात मी एन आय ए च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटणार, आता एकच चार्जशीट दाखल झाली आहे.

    यापुढे अजून होऊ शकतात, हिरेन प्रकरणात कोण कोणते अधिकारी होते ते उघड करणार. यशवंत जाधव प्रकरणाचा पाठपूरावा करण्यासाठी गेलो होतो, येत्या 15 दिवसात यात देखील काही घडामोडी आपल्याला दिसून येतील. केंद्रीय तपास यंत्रणांना धमक्या दिल्या जात आहेत, तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकतात अशी धमकी शिवसेनेकडून केंद्रीय यंत्रणांचा तपास अधिकाऱ्यांना दिल्या जात आहे. माझ्याकडे पुरावे आहे. किरीट सोमय्या मनसुख हिरण यांच्या कुटुंबीयांची भाजपच्या प्रतिनिधींनी घेतली भेट, यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे होते उपस्थित. या प्रकरणात आता चार्जशीट दाखल केली असून त्याच हत्ती चा मुख्य सूत्रधार म्हणून प्रदीप शर्मा यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता या केसला कलाटणी मिळाली आहे.मी आज संजय पांडे यांना आवाहन करतो.की हिंम्मत असेल तर माझ्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा.