यांचं ठरलं पण..! यश कन्स्ट्रक्शनचे विजय कुमार त्रिपाठी यांच्या नावावर शिक्कामोर्तब; अनिल परबांच्या साई रिसॉर्टवर मारणार हातोडा

महिन्यभरापूर्वीच या रिसॉटच्या पाडकामासाठी (Demolition Work) महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात १ कोटी १ लाख २५ हजार रुपये जमा केले आहेत.

    मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) दापोली तालुक्यातील मुरुड (Dapoli Taluka, Murud) येथील रत्नागिरीचे माजी मंत्री अनिल परब (Former Minister of Ratnagiri Anil Parab) यांचे प्रसिद्ध साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्यासाठी यश कन्स्ट्रक्शनचे विजय कुमार त्रिपाठी (Yash Constructions Vijay Kumar Tripathi) यांची नियुक्ती (Appointed As Contractor) करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली आहे.

    महिन्यभरापूर्वीच या रिसॉटच्या पाडकामासाठी (Demolition Work) महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात १ कोटी १ लाख २५ हजार रुपये जमा केले आहेत. ही माहितीही सोमय्या यांनी ट्विट करत दिली होती.

    किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या म्हाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील घोटाळयाचे स्मारक मुरुड येथील साई रिसॉर्ट दसऱ्यापर्यंत जमीनदोस्त होईल, असं म्हटलं होतं, मात्र, दसऱ्याची डेडलाईन उलटून गेली आहे. आता सोमय्यांनी अद्यापपर्यंत तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. मात्र आता निधीची तरतूद झाल्याने ही कारवाई येत्या काही दिवसात केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असं म्हटलं होतं. आता नुसतंच कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक झाल्याची माहिती दिली असून पाडकामाला मुहुर्त कधी मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

    केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाने नुकतेच मुरुड येथील लोकप्रिय रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर राज्य सरकारनेही तातडीने पावले उचलली आहेत. रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रिसॉर्ट पाडण्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली होती.

    सोमय्यांनी तेव्हा सदानंद कदम यांनी चौकशीवेळी परब यांनी मला रिसॉर्ट विकले, असं लिहून दिल्याचा दावा केला होता. दापोलीतील रिसॉर्ट अनिल परब यांचे आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. वीज आणि कर लावण्यासाठी अनिल परब यांनीच अर्ज केला आहे, तसेच या प्रकरणी त्यांना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात येईल, असा दावाही सोमय्यांनी केला होता.