
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपूर्वी यांचा कथित व्हिडीओप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांच्याकडे तब्बल 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, या याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
त्याचबरोबर आरोपीने किरीट सोमय्यांचा कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे तब्बल 50 लाखांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात एक मेल आला होता. त्यामध्ये अज्ञाताने सोमय्यांना त्यांचा कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
’50 लाख रुपये द्या अन्यथा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन’, अशी धमकी किरीट सोमय्यांना मेलवरुन देण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांचा एक अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओनंतर हे प्रकरण विधानसभा आणि विधान परिषदेच्या आधिवेशनात चर्चेत आले होते. हाच कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, अज्ञात आरोपीने दिली आहे. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 385 अन्वये नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.