किसान काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा. विश्वंभर बाबर यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले  यांचे हस्ते व किसान काँग्रेसचे राज्य अध्यक्ष पराग पष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर  यांना किसान काँग्रेस  प्रदेश उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र टिळक भवन  मुंबई येथील कार्यक्रमात  देण्यात आले .

    म्हसवड :  राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत महाराष्ट्र राज्य किसान  काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माण तालुक्यातील देवापूर गावचे सुपुत्र कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले  यांचे हस्ते व किसान काँग्रेसचे राज्य अध्यक्ष पराग पष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर  यांना किसान काँग्रेस  प्रदेश उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र टिळक भवन  मुंबई येथील कार्यक्रमात  देण्यात आले .यावेळी राज्यस्तरीय अनेक पदाधिकारी उपस्थित होते.  सदर नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे. प्रा. बाबर यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष पदाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र संघटन प्रमुख  या पदाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आली आहे .
    शेतकरी ,कष्टकरी,शेतमजूर यांचे हक्क  व  हित जोपासून  त्यांना न्याय मिळवून देण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस मजबूत करण्याचा निर्धार प्रा. विश्वंभर बाबर यांनी यानिमित्ताने व्यक्त केला .महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, राज्य संघटन व प्रशासन सरचिटणीस प्रमोद मोरे व देवानंद पवार,किसान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी प्रकाश घाले, महाराष्ट्र किसान व शेतमजूर काँग्रेसचे अध्यक्ष पराग पष्टे, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्यासह प्रदेश व जिल्हा काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रा. बाबर यांचे अभिनंदन केले आहे.