राष्ट्रवादी सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी किशोर सोनवणे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी म्हसवड येथील किशोर भोजलींग सोनवणे यांची निवड करण्यात आली असुन नुकतेच त्यांना सदर निवडीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

  म्हसवड : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी म्हसवड येथील किशोर भोजलींग सोनवणे यांची निवड करण्यात आली असुन नुकतेच त्यांना सदर निवडीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

  सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो, हा बालेकिल्ला आणखी मजबुत करण्यासाठी ग्रामीण भागातील सर्वसामान्य तरुणांना या पक्षात सामावुन घेत त्यांच्यावर संगठन मजबुत करण्याची जबाबादारी पक्षश्रेष्ठींकडुन दिली जात आहे यासाठी पक्षाचे निरीक्षक जिल्हाभर फिरुन‌ पक्षासाठी काम करणार्या, सर्वसामान्यांना सामावुन घेणार्या तरुणांचा शोध घेत त्यांनाही संधी देत आहेत. किशोर सोनवणे हे गत २० वर्षापासुन एक दलित सामाजिक कार्यकर्ते म्हणुन माणसह जिल्हाभर ओळखले जात आहेत, आजवर त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी अनेकदा विविध आंदोलने केली असुन सर्वसामान्यांचा लढवय्या नेता म्हणुन ग्रामीण जनतेत त्यांची वेगळी ओळख आहे.

  म्हसवड शहराच्याही विविध प्रश्नावर त्यांनी‌ आजवर अनेक आंदोलने केली असुन‌ ते गत ५ वर्षापासुन माण – खटाव राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणुन कार्यरत आहेत, प्रभाकर देशमुख यांच्याच शिफारशीमुळे त्यांची राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती श्रेष्ठींनी केली असुन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोनवणे यांना सदर निवडीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. सोनवणे यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वसामान्य व दलित जनतेतुन प्रभाकर देशमुख यांचे विशेष आभार मानले जात असुन देशमुख हे सामान्यांचे नेते असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतुन दाखवले असल्याचे सामान्य जनता बोलत आहे.

  सोनवणे यांच्या सदर नियुक्तीबद्दल म्हसवडचे माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, माजी उपनगराध्यक्ष धनाजी माने, माजी नगरसेवक गणेश रसाळ, दत्तात्रय रोकडे, कैलास भोरे, अनिल कांबळे, किरण कलढोणे, शिवदास रसाळ‌ विजय टाकणे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

  विश्वास सार्थ ठरवणार – किशोर सोनवणे 

  सदर निवडीबद्दल किशोर सोनवणे यांनी सांगितले‌ कि माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील तरुणावर प्रभाकर देशमुख यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मी यापुढे आणखी जोमाने काम करुन ग्रामीण भागातील सामान्य जनतेपर्यंत पक्षाचे काम पोहचवणार आहे, आगामी काळात माणमध्ये राष्ट्रवादी ची एक मजबुत मोट बांधण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावुन माण तालुका हा राष्ट्रवादीमय बनवणार आहे.