पोलिसांची कर्मचाऱ्यांची पोलीस स्टेशनमध्येच जुंपली, एकानं केला चाकू हल्ला

घटनेनंतर केंद्रे यांना तात्काळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याची माहिती आहे

    औरंगाबाद : औरंगाबादमधून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. येथील जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर तिथल्याच एका कर्मचाऱ्याने चाकू हल्ला केल्याची (Attack on police officer) खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पोलीस अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

    व्यंकटेश केंद्रे असे हल्ला झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. हे जिन्सी पोलीस स्टेशनचे ठाणेप्रमुख आहे. मंगळवारी पोलीस ठाण्यात त्यांना एक सामजिक संघटनेच शिष्टमंडळ भेटायला आले होते. शिष्टमंडळाकडून केंद्र सत्कार स्वीकारतच असताना शेख मुजाहिद नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने केंद्र यांच्यावर अचानकपणे चाकू हल्ला केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला होता. त्यांनतर केंद्रे यांना तात्काळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याची माहिती आहे.