कोकणात वाढणार काजूचे उत्पादन, राज्य सरकारकडून अल्प व्याजदरात कर्ज, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

ओल्या काजूगराला अधिक किंमत मिळत असल्याने प्रायोगिकतत्वावर ओला काजूगर काढण्याच्या मिशन लुधियानावरुन मागविण्यात येणार आहेत. या मशिन मागविल्यानंतर ओला काजूगराचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणारे काजूचे वाण विकसित करण्याच्या सूचना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

  मुंबई : शेती उत्पादन वाढवण्यासाठी कायम सरकारचे प्रयत्न राहिलेले आहेत. काजूसाठी पोषक वातावरण असून येथे काजूचे उत्पादन वाढीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे. कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्यसरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्य शासनाच्यावतीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.

  तसेच ओल्या काजूगराला अधिक किंमत मिळत असल्याने प्रायोगिकतत्वावर ओला काजूगर काढण्याच्या मिशन लुधियानावरुन मागविण्यात येणार आहेत. या मशिन मागविल्यानंतर ओला काजूगराचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणारे काजूचे वाण विकसित करण्याच्या सूचना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

  बैठकीत काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचाही आढावा

  काजू उत्पादक शेतकऱ्यांना शेती करताना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते त्याअनुशंगाने ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात पार पडली. यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम उपस्थित होते.

  वाण विकसित करण्याच्या कोकण विद्यापीठाला सूचना

  काजूचे उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने वाण विकसीत करण्याच्या सुचना यावेळी उपमुख्यमंत्री यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांना दिल्या. वाण विकसीत झाले तर उत्पादन वाढण्यात आणखीन मदत होणार आहे. शिवाय स्थानिक पातळीवर काजू शेती करीत असताना शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याचाही आढावा त्यांनी व्हीसीद्वारे घेतला आहे.