पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर २७ सप्टेंबरला सुनावणी

 सध्या संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे 4 ऑक्टोबरपर्यंत राऊतांना न्यायलयीन कोठडीतचं राहावे लागणार आहे. 

    मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे तर मुख्य आरोपी प्रवीण राऊतच्या जामीन अर्जावर शुक्रवारी नियमित सुनावणी होणार आहे.  सध्या संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे 4 ऑक्टोबरपर्यंत राऊतांना न्यायलयीन कोठडीतचं राहावे लागणार आहे.

    ईडीने (ED) पाच दिवसांपूर्वी पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतां विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. आता या आरोपपत्रातून नव नवीन माहिती समोर येत आहे. 2006-2007 या काळात एका तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकासांच काम देण्याबाबच चर्चाही झाली. त्यानंतर या प्रकरणात 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं चार्जशिटमध्ये उल्लेख असल्याचीही माहिती समोर आली आहे.