कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी असणार डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कायम आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने डोकं वर काढले असून तिसऱ्या लाटचे प्रादुर्भाव सुरु झाला आहे. अनेक देशात पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. यादरम्यान, भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे पण तिची तीव्रता कमी असण्याची शक्यता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे.

    नवी दिल्ली : मागील महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण देशभरात कमी आढळत असल्यामुळं अनेक क्षेत्रांना खुलं करण्याची परवानगी देण्यात आली आहे. देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणि मृतांच्या आकड्यात देखील दिवसेंदिवस घट होत चालली आहे. अशामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कायम आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने डोकं वर काढले असून तिसऱ्या लाटचे प्रादुर्भाव सुरु झाला आहे. अनेक देशात पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. यादरम्यान, भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे पण तिची तीव्रता कमी असण्याची शक्यता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे. तसेच तज्ज्ञांनी सुद्धा याआदी असं म्हटलं आहे

    सध्या देशामध्ये सिरो पॉझिटिव्हिटीचे प्रमाणही वाढलेले आहे. सध्या बूस्टर डोस देण्याची काहीही गरज नाह. कदाचित भविष्यात बूस्टर डोसची गरज भासू शकते. लसीकरणाची मोहीम वेगाने राबवली जात आहे. कोरोनामुळे प्रकृत गंभीर होण्याचे, रुग्णालयामध्ये दाखल होण्याचे आणि कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात घट होत असल्याचे निरीक्षणातून उघड झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.

    दरम्यान भारत बायटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीबाबत आयसीएमआरचे (ICMR) संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी ‘गोईंग व्हायरल’ पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. रणदीप गुलेरिया यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘देशात कोरोनाची तिसरी लाट तीव्र येण्याची शक्यता कमी आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या लाटेची शक्यता नसल्याने बूस्टर डोस देण्याचीही आवश्यकता नसून लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याच गरज आहे.’ तसंच, ‘कोरोना संसर्गात खूप वाढ झाल्याचे दिसून आलेले नाही.’, असे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान कोव्हॅक्सिन ही लस पन्नास टक्के प्रभावी असल्याचं लॅन्सेटनं म्हटले आहे.