१५ ते १८ वयोगटातील १ लाख मुलांचे मुंबई महापालिकेकडून लसीकरण पूर्ण

मुंबई महापालिकेतर्फे १५ ते १८ वर्षे वयोगटातील १ लाख ८ हजार ३८० मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी पालिका लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणार असून लवकरच शाळा-कॉलेजमध्येसुद्धा लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. तसेच लसीकरण आणि वाढवाणार असल्याचं सुद्धा पालिकेनं म्हटलं आहे.

    मुंबई : एकिकडे कोरोना आणि ओमायक्रॉनच रुग्ण वाढत असताना, दुसरीकडे एख दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबई महापालिकेतर्फे १५ ते १८ वर्षे वयोगटातील १ लाख ८ हजार ३८० मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी पालिका लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणार असून लवकरच शाळा-कॉलेजमध्येसुद्धा लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. तसेच लसीकरण आणि वाढवाणार असल्याचं सुद्धा पालिकेनं म्हटलं आहे.

    मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत, तसेच कोविडचा संसर्ग अद्यापही कमी होत नाही. त्यात ओमायक्रॉन या नवीन विषाणू प्रकाराची भर पडल्याने काही दिवसांपूर्वी बाधित रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली होती. सुदैवाने पालिकेने तातडीने उपाययोजना, जनजागृती आदी बाबींचा अवलंब केल्याने गेल्या २ – ३ दिवसांत रुग्ण संख्येत बऱ्यापैकी घट होऊ लागली आहे.

    महापालिकेने कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला परतावून लावल्यावर तिसरी लाटही धडकली आहे. मात्र पालिकेने सतर्कता बाळगत पूर्व तयारी अगोदरपासून केल्याने रुग्ण संख्या सध्या नितंत्रणात येत आहे.
    पालिकेने, १५ ते १८ या वयोगटातील ९ लाख मुलांना लस देण्यासाठी ३ जानेवारीपासून मोहीम हाती घेतली. १२ जानेवारीपर्यंत १ लाख ८ हजार ३८० मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

    दरम्यान, आगामी काळात १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे आणखी लसीकरण वाढवणार आहे, तसेच लसीकरण केंद्र सुद्धा वाढवणार आहे, सध्या कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण आढळत असले तरी, ते रुग्णालयात दाखल होण्याऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळं बेड सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचं मुंबई महानगर पालिकेनं सांगितलं.