शिवसेनेचं काय होणार? पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह मिळणार का? उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 15 महत्त्वाचे मुद्दे

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  मुंबई- ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  1.  शिवसेनेचं काय होणार, पक्ष आणि पक्षचिन्ह मिळणार का नाही याबाबत दोन दरबारात सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात सुनावणी सुरु
  2. निवडणूक आयोगातील सुनावणी पूर्ण झाली आहे. लिखित स्वरुपात शिवसेनेनं आयोगात माहिती दिली आहे.
  3. शिंदे गटाला आपण शिवसेना मानत नाही, शिवसेना एकच राहणार
  4. शिवसेनेच्या घटनेनुसार निवडणुका होतात. पक्षप्रमुखाची निवडणूक 23 जानेवारीला होणं अपेक्षित होतं. निवडणूक आयोगानं परवानगी दिल्यानंतर ही निवडणूक होईल.
  5.  शिवसेनेतील मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे.
  6. मुंबईसह शहरांतच विभाग प्रमुख पद आहे, इतर ठिकाणी हे पद नाही.
  7. काही लाख सदस्यांचे पक्षातील अर्ज भरुन घेतले आहेत.
  8. निवडून आलेल्यांच्या आधारावरच जर निर्णय द्यावा असा आग्रह असेल तर तो हस्यास्पद आहे.
  9. विधान परिषद निवडणुकीत गद्दारी करुन जे पळून गेले त्यांनी शिवसेनेवर दावा केला, हे विकृतपणाचा आहे.
  10. आधी 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात होण्याची गरज आहे.
  11.  जर सदस्य अपात्र होणार असतील तर त्यांचा दावा आयोगासमोर कसा असेल, त्यामुळं अपात्रतेचा निर्णय होण्याची गरज आहे.
  12. सध्या देशात सुप्रीम कोर्टावरही अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे.
  13. सुप्रीम कोर्टातील निर्णय लवकर लागण्याची आवश्यकता आहे.
  14. जर विधिमंडळांच्या सदस्यांच्या आधारे निर्णय होणार असेल तर कोणताही उद्योगपती उद्या पक्ष काढू शकेल.
  15. देशातील लोकशाहीसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे.