राज्यात १०,९८९ नवीन रुग्ण; मुंबईत दिवसभरात ७८५ रूग्णांची नोंद

बुधवारी राज्यात १०,९८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,६३,८८० झाली आहे. आज १६,३७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५५,९७,३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,६१,८६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  मुंबई : बुधवारी राज्यात १०,९८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,६३,८८० झाली आहे. आज १६,३७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५५,९७,३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,६१,८६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  दरम्यान, राज्यात काल २६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण २६१ मृत्यूंपैकी १७० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४०० ने वाढली आहे.

  हे ४०० मृत्यू, पुणे-१४२, ठाणे-४३, नाशिक-३९, औरंगाबाद-२४, कोल्हापूर-२०, अहमदनगर-१९, उस्मानाबाद-१८, पालघर-१६, नांदेड-१३, अकोला-९, नागपूर-९, सांगली-८, सातारा-८, हिंगोली-६, रत्नागिरी-६, यवतमाळ-५, बुलढाणा-४, जालना-३, बीड-२, चंद्रपूर-२, लातूर-२, सिंधुदुर्ग-१ आणि सोलापूर-१ असे आहेत.
  सध्या राज्यातील मृत्यूदर १.७४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७१,२८,०९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,६३,८८० (१५.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,३५,३४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  मुंबईत दिवसभरात ७८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७१२८४० एवढी झाली आहे. तर २७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५०३३ मृत्यूची नोंद करण्यात आली.

  हे सुद्धा वाचा