राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये १,१४३ युनिट प्लाझ्माचा साठा !

मागील काही महिन्यात काेराेना रुग्णांसाठी वरदान ठरलेली प्लाझ्मा थेरपी घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी झाले आहे. हाताच्या बाेटावर माेजण्या इतक्याच रुग्णाचे नातेवाईक प्लाझ्मा थेरेपीकरीता पुढे सरसावत आहेत. राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या १,१४३ युनिट प्लाझ्मा साठा उपलब्ध असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबई (Mumbai).  मागील काही महिन्यात काेराेना रुग्णांसाठी वरदान ठरलेली प्लाझ्मा थेरपी घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी झाले आहे. हाताच्या बाेटावर माेजण्या इतक्याच रुग्णाचे नातेवाईक प्लाझ्मा थेरेपीकरीता पुढे सरसावत आहेत. राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या १,१४३ युनिट प्लाझ्मा साठा उपलब्ध असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा थेरेपी प्रभावी उपचार पद्धती असल्याचे तज्ज्ञ डाॅक्टरांचे म्हणणे आहे. ज्यामुळे प्लाझ्माची मागणी दिवसेंदिवस वाढत गेली. पण मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रुग्णसंख्या कमी झाली आहे. शिवाय प्लाझ्मा थेरपीची शिफारस करणाऱ्या सूचनांमध्येही घट झाली असल्याने प्लाझ्माची मागणी घटली आहे. ज्यामुळे आता कोविड रुग्णांसाठी कमीतकमी १,१४३ प्लाझ्मा युनिट अजूनही रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध आहे.