तौक्ते चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसाठी १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर, कोकणच्या किनारपट्टीवरील गावांना मिळणार मोठा दिलासा

कोकणवासीयांसाठी तब्बल 152 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याच्या किनारपट्टीवरील जिह्यांना 16 व 17 मे रोजी तौक्ते चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसला होता. यामध्ये कोकणातील आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागांचा तसेच घरांचे प्रचंड नुकसान झाले.

    तौक्ते चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसाठी 170 कोटी 72 लाख 73 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात  आला आहे. त्यामुळे वादळग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. या वादळात कोकणच्या किनारपट्टीवरील गावांना सर्वाधिक फटका बसला होता. त्यामुळे कोकणवासीयांसाठी तब्बल 152 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याच्या किनारपट्टीवरील जिह्यांना 16 व 17 मे रोजी तौक्ते चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसला होता. यामध्ये कोकणातील आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागांचा तसेच घरांचे प्रचंड नुकसान झाले.

    मच्छीमारांच्या बोटी, मासेमारीच्या जाळीचेही प्रचंड नुकसान झाले. अनेकांना यामध्ये जीव गमवावा लागला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिह्यांना भेट देऊन नुकसानग्रस्त गावांची पाहणीही केली होती. एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार राज्य सरकारने वादळग्रस्तांना मदत केली.

    या वादळग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य सरकारच्या शासनाच्या निधीमधून  170 कोटी 72 लाख 73 हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.