
निवडणुकीच्या (Election) ताेंडावर रस्त्यांच्या कामाचे तब्बल १७८६ काेटी ४७ लाख रुपयांचे ४० प्रस्ताव मंजूरीसाठी (Expenditure For Road Work) आणले आहेत. या प्रस्तावांना स्थायी समितीची मंजूरी मिळाल्यास मुंबईत (Mumbai) रस्त्यांच्या कामांचा बार उडणार आहे.
मुंबई : पालिका निवडणुकीच्या(Election) ताेंडावर प्रशासनाने रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण तसेच रस्ते दुरूस्तीचे तब्बल १७८६ काेटी ४७ लाख रुपयांचे ४० प्रस्ताव मंजूरीसाठी (Expenditure For Road Work)आणले आहेत. या प्रस्तावांना स्थायी समितीची मंजूरी मिळाल्यास मुंबईत (Mumbai) रस्त्यांच्या कामांचा बार उडणार आहे. निवडणूक आचारसंहितेच्या कात्रीत अडकण्याआधी सत्ताधारी शिवसेनेने घाऊक प्रस्तावांच्या मंजूरीची घाई केल्याचे दिसून येत आहे. काेराेनाच्या काळात गेल्या वर्षभरात सत्ताधाऱ्यांनी मंजूर केलेल्या काेट्यावधी रुपयांच्या प्रस्तावावर विराेधकांनी रान उठविले आहे. असे असताना आता या काेट्यावधीच्या कामांबाबत विराेधक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुसळधार पाऊस, त्यात भरीस भर म्हणून मुंबईत धडकलेले ताैक्ते वादळ यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली. रस्त्यांतील खड्डयांचे राजकारण झाले. यापूर्वीही रस्त्यांच्या कामांवरून शिवसेनेवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आराेप केले हाेते. भाजप आणि शिवसेना आता एकमेकांच्या विराेधात आहेत. भाजपा शिवसेनेवर टीका करण्याची संधी साेडत नाही. भाजपाने प्रशासनालाही साेडले नाही. यंदा पाऊस लांबल्यामुळे रस्त्यांचे दशावतार नागरिकांना पाहायला मिळाले. नागरिकांमध्येही असंताेष निर्माण झाला हाेता. निवडणुकीत नागरिकांचा हा राेष दिसून येईल याची जाणीव झाल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने आता विभागवार रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे, डांबरीकरणाचे, सुशाेभिकरणाचे तसेच रस्त्यांच्या दुरूस्तीकामांचे भरघाेस प्रस्ताव मंजूरीसाठी आणल्याचे चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
मुंबईतून विधान परिषदेच्या दाेन जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्या निवडणुकीची आचारसंहिता मुंबईतही लागू हाेती. आचार संहितेच्या काळात माेठे आर्थिक विषयांचे आणि महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने स्थायी समितीत हे प्रस्ताव मंजूरीसाठी आणले नव्हते. निवडणूक संपल्याने आता हे काेट्यावधी रुपयांच्या खर्चाचे प्रस्ताव प्रशासनाने मंजूरीसाठी आणले आहेत. प्रस्तावांना मंजूरी मिळाल्यास मुंबई शहर आणि उपनगरात रस्त्यांच्या कामांचा धुमधडाका सुरू हाेणार आहे. एैन निवडणुकीच्या ताेंडावर आणलेल्या या प्रस्तावांमुळे विराेधी पक्ष आता काेणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वांद्रे, वरळी आणि ग्रँट राेडला झुकते माप
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ असलेला वरळी आणि त्यांचे निवासस्था असलेला वांद्रे हा विभाग या भागात सुमारे १७५ काेटी रुपयांचे रस्त्यांचे प्रस्ताव मंजूरीसाठी आले आहेत. त्या पाठाेपाठ ग्रँटराेडआणि भांडूप या भागातही रस्त्यांसाठी जादा निधी दिल्याचे या प्रस्तावांवरून दिसून येत आहे.
रस्त्यांच्या कामांचे काेट्यावधी किमतीचे प्रस्ताव
वरळी – ७१ काेटी ३९ लाख ५० हजार रुपये
मरीनलाईन्स – ४७ काेटी ९८ लाख ७१ रुपये
अंधेरी पूर्व -७२ काेटी ५४ लाख ९५ हजार
अंधेरी पश्चिम – २१ काेटी ५८ लाख ५६ हजार
मालाड – ७३ काेटी ३८ लाख ७० हजार
ग्रटराेड – ९० काेटी २४ लाख ५७ हजार
परळ- ५३ काेटी ५४ लाख ७७ हजार
गाेरेगाव – १९ काेटी ३२ लाख ६ हजार
चेंबूर – ३८ काेटी ६७ लाख १२ हजार
वांद्रे – ११४ काेटी ४९ लाख १८ हजार
वांद्रे दादर – २७ काेटी २२ लाख ७४ हजार
मुलुंड – ५० काेटी १४ लाख ५८ हजार
परळ – ३९ काेटी ५४ लाख ०३ हजार
घाटकाेपर आणि मुलुंड म्हाडा परिसरातील रस्ते – ७० काेटी ८० लाख ९१ हजार
दहिसर – २६२ काेटी ४२ लाख ५५ हजार
भांडूप -१४७ काेटी ४७ लाख ०१ हजार
कुर्ला आणि चेंबूर – २१७ काेटी ५९ लाख ५८ हजार
भायखळा – १०७ काेटी ०१ लाख ३७ हजार
खार – ५४ काेटी ४६ लाख ८३ हजार
कांदिवली – १०० काेटी ५५ लाख ६२ हजार