मध्य रेल्वेच्या मार्गावर आज १८ तासांचा महा मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून मगच प्रवासाचा आखा बेत

मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्तांनी शुक्रवारी या मार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यांच्या मंजुरीनंतर या मार्गाच्या कामासाठी आज (रविवारी) 18 तासांचा मेगाब्लॉक घेण्याचं निश्चित करण्यात आलं. रविवारी सकाळी 07.47 ते 23.52 या वेळेत कल्याणहून सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी अप धीम्या/अर्ध जलद सेवा दिवा आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, जी मुंब्रा आणि कळवा येथे थांबणार नाही. त्यांना मुलुंड स्थानकावर अप स्लो मार्गावर पुनर्निर्देशित केले जाईल आणि निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशीरा त्यांच्या शेवटच्या स्थानकापर्यंत पोहोचतील.

    मुंबई : मध्य रेल्वेच्या मार्गावर ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन तयार करण्यात येत आहे. जुन्या मार्गाला जोडण्यासाठी आज (रविवारी) 18 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान काही मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही शेवटच्या थांब्यापूर्वी थांबवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सुमारे 150 उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान कळवा आणि मुंब्रा येथे सेवा उपलब्ध होणार नाहीत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या समन्वयाने बसेस चालवण्याची व्यवस्था केली आहे.

    मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्तांनी शुक्रवारी या मार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यांच्या मंजुरीनंतर या मार्गाच्या कामासाठी आज (रविवारी) 18 तासांचा मेगाब्लॉक घेण्याचं निश्चित करण्यात आलं.

    रविवारी सकाळी 07.47 ते 23.52 या वेळेत कल्याणहून सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी अप धीम्या/अर्ध जलद सेवा दिवा आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, जी मुंब्रा आणि कळवा येथे थांबणार नाही. त्यांना मुलुंड स्थानकावर अप स्लो मार्गावर पुनर्निर्देशित केले जाईल आणि निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशीरा त्यांच्या शेवटच्या स्थानकापर्यंत पोहोचतील.

    CSMT पासून सकाळी 07.42 ते 01.15 पर्यंत (20.12.2021 रोजी) सुटणाऱ्या स्लो/सेमी-फास्ट सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील, ज्या कळवा आणि मुंब्रा स्थानकावर थांबणार नाहीत. ते दिवा स्थानकावर धीम्या मार्गावर पुनर्निर्देशित केले जातील आणि निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.

    जम्बो ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द

    दि. १८.१२.२०२१ (शनिवार) रोजी सुरु होणारा एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास रद्द

    12112 अमरावती- मुंबई एक्सप्रेस

    17611 नांदेड- मुंबई एक्सप्रेस

    11030 कोल्हापूर- मुंबई कोयना एक्सप्रेस

    दि. १९.१२.२०२१ (रविवार) रोजी सुरु होणारा एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास रद्द

    11007 / 11008 मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस,

    12109 /12110 मुंबई – मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस,

    12071 /12072 मुंबई – जालना- मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस,

    11401 मुंबई -आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस,

    12123 /12124 मुंबई -पुणे – मुंबई डेक्कन क्वीन,

    12111 मुंबई -अमरावती एक्सप्रेस,

    11139 मुंबई- गदग एक्सप्रेस,

    17612 मुंबई-नांदेड एक्सप्रेस,

    11029 मुंबई- कोल्हापूर कोयना एक्सप्रेस